पडेगावातील घर फोडून पळविला लाखाचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 23:10 IST2019-03-24T23:10:00+5:302019-03-24T23:10:10+5:30

पडेगाव येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख ३५ हजार, असा सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेला.

Lack of larceny broke into a house in Padgaon | पडेगावातील घर फोडून पळविला लाखाचा ऐवज

पडेगावातील घर फोडून पळविला लाखाचा ऐवज

औरंगाबाद : पडेगाव येथील बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख ३५ हजार, असा सुमारे एक लाखाचा ऐवज चोरून नेला. ही घटना २२ मार्च रोजी रात्री घडली.


पडेगाव येथील रहिवासी अनिल मगनराव कुकलारे हे खाजगी नोकरी करतात. २२ मार्च रोजी अनिल हे सहकुटुंब बाहेरगावी गेले असताना रात्री ८.३० वाजेच्या सुमारास संधी साधून चोरट्यांनी कुकलारे यांच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील लाकडी कपाट उघडून त्यातील ३५ हजारांची रोकड आणि ६० हजार रुपये किमतीचे जुन्या वापराचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून चोरटे पसार झाले.

दुसऱ्या दिवशी २३ मार्च रोजी रात्री ३ वाजेच्या सुमारास अनिल हे गावाहून घरी परतले तेव्हा त्यांना चोरट्यांनी घर फोडल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती छावणी पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अनिल यांच्या तक्रारीवरून चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविला. पोलीस उपनिरीक्षक ठोकळ हे तपास करीत आहे.
 

Web Title: Lack of larceny broke into a house in Padgaon