शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

ढोकी परिसरात अवैध धंद्याला ऊत

By admin | Updated: December 8, 2015 00:04 IST

ढोकी : पोलीस ठाण्याचे गाव असलेल्या ढोकीसह परिसरात अवैध हातभट्टी, दारूविक्री, मटका, जुगार आदी अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून,

ढोकी : पोलीस ठाण्याचे गाव असलेल्या ढोकीसह परिसरात अवैध हातभट्टी, दारूविक्री, मटका, जुगार आदी अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले असून, अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत़ दारूमुळे भांडण-तंट्यात वाढ झाली असून, पोलीस प्रशासनासह राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध धंदे रोखण्याऐवजी बघ्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे़उस्मानाबाद तालुक्यातील राजकीयदृष्ट्या आणि बाजारपेठेच्या दृष्टीने ढोकी गावाची सर्वत्र ओळख आहे़ साधारणत: १५ हजार लोकसंख्येच्या गावातील तेरणा कारखान्यामुळे आर्थिक सुबत्ता आली़ कारखाना बंद पडला तरी इतर सुरू असलेल्या व्यवसायामुळे काही प्रमाणात आर्थिक उलाढाली सुरू आहेत़ दुष्काळी परिस्थितीत अनेकांना पोटाची खळगी भरणे मुश्किल होवून बसले आहे़ मात्र, येथे सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे मात्र, अनेकांचे संसार उध्दवस्त होऊ लागले आहेत़ अवैध हातभट्टी, देशीदारूविक्री, मटका- जुगार आदी धंदेही जोमात सुरू आहेत़ दारूमुळे युवा पिढीही व्यसनाधीन होत असून, भांडण तंट्यातही वाढ झाली आहे़ अवैध धंद्यांना आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या ढोकी पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागानेकही अवैध दारूविक्रेत्यांकडे कानाडोळा होत आहे़ ढोकी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कसबे तडवळे, तावरजखेडा, पळसप, आरणी, कोंड, तेर या गावातही अवैध दारूविक्रीसह इतर अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू झाला आहे़ पोलीस प्रशासनाकडून काही गावात किरकोळ कारवाई करून दोन-चार बाटल्या किंवा ट्यूब पकडले जातात़ त्यानंतर काही तासातच कारवाई झालेला दारूविक्रेता पुन्हा गावात येवून दारूविक्री सुरू करीत असल्याचे सांगितले जात आहे़ महिलांच्या तक्रारीनंतर कारवाईमागील काही महिन्यापूर्वी गोरेवाडी येथील महिलांनी अवैधरित्या किराणा दुकानात दारूविक्री केली जात असल्याची तक्रार ढोकी पोलिसांकडे केली होती़ महिलांनी तक्रार केल्यानंतरच पोलीस प्रशासनाने संबंधित दारूविक्रेत्यांवर कारवाई केली़ (वार्ताहर)