शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

मजूर अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात

By admin | Updated: November 25, 2014 00:59 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील कांबळे नावाचे कर्मचारी ओळखीचे असून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो,

औरंगाबाद : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील कांबळे नावाचे कर्मचारी ओळखीचे असून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे सांगून एका महिलेकडून दहा हजारांची लाच घेणाऱ्या एका मजुराला अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी अटक केली.राजेश बाबूलाल खरे (४०, रा. कैलासनगर, गल्ली नंबर ४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याविषयी अ‍ॅन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपंग कल्याण योजनेंतर्गत जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागामार्फत स्वयंरोजगारासाठी कर्ज देण्यात येते. सदर महिलेची मुलगी आणि बहीण अपंग आहेत. स्वयंरोजगारासाठी कर्ज मिळण्याची माहिती जाणून घेण्यासाठी त्या जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात गेल्या. तेथे त्यांना राजेश खरे भेटला. त्यावेळी त्याने त्यांना या कार्यालयातील कांबळे हे आपल्या ओळखीचे असून त्यांच्यामार्फत तुमच्या बहीण आणि मुलीसाठी प्रत्येकी दीड लाख रुपये कर्ज मिळवून देतो, असे सांगितले. आवश्यक कागदपत्रांची माहिती त्याने दिली व अन्य लोकांच्या कर्जाच्या फाईल्सही दाखविल्या. प्रत्येक फाईलकरिता २० हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. अ‍ॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांनी पंचाकडून याबाबत सत्यता जाणून घेतली. तेव्हा पंचासमक्ष खरे याने तडजोड करून दहा हजार रुपये २४ नोव्हेंबर रोजी दुपारी आणून देण्याचे सांगितले. दुपारी कैलासनगर येथील सातपुते यांच्या घरी १० हजारांची लाच घेताना त्यास पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक रामनाथ चोपडे, निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, नीलेश देसले, कर्मचारी श्रीराम नांदुरे, हरिभाऊ कुऱ्हे, अश्वलिंग होनराव, बाळासाहेब महाजन यांनी सापळा रचला होता. ४महिलेने त्याच्याकडे चार फाईल दिल्या होत्या. त्याकरिता महिलेने वर्षभरात टप्प्याटप्प्याने खरे यास ८० हजार रुपये दिले. त्यानंतरही खरे याने १७ नोव्हेंबर रोजी त्यांच्याकडे आणखी २० हजारांची मागणी केली. महिलेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली.