शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

कुणबीच्या नोंदी,आरक्षणाची नांदी; मराठवाड्यातील १९ तालुक्यांत आढळले मराठा 'कुणबी'चे पुरावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2023 12:27 IST

शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील महसुली दस्तांची जंत्री उघडली आहे. त्यात पाच जिल्ह्यांतील १९ तालुक्यांतील ८० हून अधिक गावांमध्ये मराठा हे कुणबी असल्याचे काही पुरावे आढळले आहेत.

- विकास राऊत

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांडे यांनी सुरू केलेल्या उपोषण आणि तेथे पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आहे. मराठवाड्यातील कुणबी (मराठा) समाजाला निजामकाळात आरक्षण लागू होते. तेच आरक्षण लागू करावे, यासह इतर मागण्यांसाठी आंतरवाली सराटीत उपोषण सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील महसुली दस्तांची जंत्री उघडली आहे. त्यात पाच जिल्ह्यांतील १९ तालुक्यांतील ८० हून अधिक गावांमध्ये मराठा हे कुणबी असल्याचे काही पुरावे आढळले आहेत. लातूर, परभणी, हिंगोली जिल्ह्यात माहिती घेतली जात आहे. विभागात सर्व मिळून ८ हजार ५५० गावे असून, सर्व ठिकाणच्या खासरा नोंदी, सातबारा, महसुली नोंदी, निजाम काळातील संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, निजाम काळात झालेले करार, राष्ट्रीय दस्ताऐवज व इतर कागदपत्रे, वंशावळ व इतर माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी जिल्हानिहाय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे.

विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी सोमवारी जेवढी माहिती उपलब्ध झाली ती ७०० पानांच्या अहवालरूपाने शासनाला सादर केली. अतिरिक्त मुख्य सचिवांची समिती यासाठी नेमली असून, महिन्याभरात माहिती संकलन करण्यात येणार आहे. संशोधनासाठी ७५ वर्षांपूर्वीच्या काळातील तथ्य संकलन महत्त्वाचे ठरणार असून, कोतवाल पंची, चारसाल पत्र, खासरा पत्र, सातबारा यातून महत्त्वाची माहिती समोर येऊ शकेल. सध्या दीड लाखांच्या आसपास सातबारा आहेत. तेवढ्याच प्रमाणात खासरा पत्रांचे अभिलेख असण्याचा अंदाज आहे.

मुख्यमंत्री व समितीमध्ये काय चर्चा झाली.....१९५१ पासून पुढील दस्तांमध्ये मराठा हे कुणबी असल्याचे पुरावे आढळत आहेत. भूमिअभिलेख, शैक्षणिक, महसूल, गॅझेटीयर याची वेगवेगळ्या टप्प्यांवर माहिती संकलित करण्यात येणार आहे. २९ मेच्या अध्यादेशानुसार हे सर्व होईल. १९३२ पर्यंत जातीनिहाय जनगणनेचे संदर्भ आहेत. आदी मुद्द्यांवर आज प्राथमिक चर्चा झाली. मंगळवारी पुन्हा समितीची बैठक होणार आहे. शैक्षणिक नोंदी, निजामकालीन सनदी, करार, वंशावळींच्या माहितीवर चर्चा होणार आहे, असे विभागीय आयुक्त आर्दड यांनी सांगितले.

हैदराबादलामधील अभिलेख तपासणार....डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथील दस्त तपासले जाणार आहेत. तसेच मराठवाडा मुक्त होण्यापूर्वीचे काही दस्त हैदराबादमध्ये असून, ते उर्दूमध्ये आहेत. त्याचीही तपासणी होणार आहे. जिल्हाधिकारी यासाठी विशेष पथक गठित करणार आहेत. अशा सूचना शासनाने दिल्या आहेत. जालना जिल्ह्याची बहुतांश माहिती समितीकडे आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात सातबारा कधीपासून....१९१० साली जमिनीच्या मोजणीसह अभिलेख तयार करून क्षेत्रनिहाय क्रमांक दिला गेला. त्याला सर्व्हे नंबर म्हटले गेले. सध्या भूमिअभिलेखात १९२६ पासूनच्या पुढील अभिलेख तपासले जातात. १९३२ पर्यंत जातीनिहाय जनगणनेचे संदर्भ आढळत आहेत. त्यानंतर निजामकाळात खासरा पत्रावरून चारसाल पत्र करवसुलीसाठी करण्यात आले. १९६०च्या नंतर सातबारा तयार होण्यास सुरुवात झाली.

निजामाच्या काळात काय होते...मराठवाड्यात १७ सप्टेंबर १९४८ पर्यंत खासरा पत्रावरच जमीन मालक, जात, वारसांचा उल्लेख होता. त्यानंतर पुढील काळात १९६० साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यानंतर सातबारा हा दस्त भूमिअभिलेखासाठी तयार करण्यात आला. पुढे १९६६ नंतर महसूल अधिनियमानुसार भूमिअभिलेखांत बदल होत गेले. या सगळ्या दस्तांमध्ये खासरा हा पुरावा जातप्रमाणपत्रांसाठी महत्त्वाचा मानला जातो.

कोणत्या जिल्ह्यात आढळले पुरावे....औरंगाबाद : औरंगाबाद, पैठण, कन्नड, फुलंब्री, गंगापूरजालना : घनसावंगी, भोकरदन, जाफ्राबाद, बदनापूर, जालना, अंबडनांदेड : किनवट, माहूर, हदगावबीड : पाटोदा, शिरूर कासार, आष्टीउस्मानाबाद : उमरगा

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादBeedबीडMarathwadaमराठवाडाOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षण