कोतवाल भरतीत घोळ !
By Admin | Updated: March 5, 2015 00:04 IST2015-03-04T23:41:00+5:302015-03-05T00:04:10+5:30
सोमनाथ खताळ , बीड कोतवाल भरतीसाठी उमेदवार हा ज्या त्या तालुक्यातीलच रहिवाशी असावा, असा नियम आहे,

कोतवाल भरतीत घोळ !
सोमनाथ खताळ , बीड
कोतवाल भरतीसाठी उमेदवार हा ज्या त्या तालुक्यातीलच रहिवाशी असावा, असा नियम आहे, मात्र वडवणी येथील कोतवाल भरतीत बीड तालुक्यातील उमेदवारालाच पात्र ठरविण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात इतर उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी धाव घेतली आहे.
कोतवाल भरती पारदर्शक होण्यासाठी प्रशासन स्तरावरून कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या, मात्र तरीही वडवणी तालुक्यात या भरतीत अपात्र उमेदवारालाच पात्र ठरविण्यात आल्याची धक्कादायक माहिती बुधवारी ‘लोकमत’ समोर आली आहे.
वडवणी तालुक्यात कोतवालाच्या एकुण १२ जागा होत्या. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी ७ जागा होत्या, यामध्ये दोन जागा महिलांसाठी होत्या. मात्र पुरूषांच्या भरतीत घोळ झाला असून सय्यद कौसर मोहतीन हा उमेदवार बीड तालुक्यातील केसापुरी परभणी येथील रहिवाशी असताना सुद्धा त्याला २५ फेब्रुवारी रोजी झालेल्या तोंडी परीक्षेत पात्र ठरविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत घोळ झाला असून ही भरती रद्द करण्यात यावी, अशी मागणी इतर उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बुधवारी केली आहे.
उमेदवारांनी घेतला आक्षेप
सय्यद कौसर या उमेदवाराचे नाव बीड तालुक्यातील केसापुरी परभणी ेयेथील मतदान यादीतही (कार्ड क्रं.टीक्यूटी २०७११६५) आहे आणि वडवणी शहरातही (कार्ड क्रं. वायवायवाय ६९२२५७९) त्याचे नाव आहे. त्यामुळे हा उमेदवार नेमका आहे कुठलचा? असा प्रश्न पडला असून या भरतीत घोळ झाल्याचा आरोप इतर पात्र उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या निवेदनात केला आहे.
तर होऊ शकतो गुन्हा दाखल
सय्यद कौसर याने डीएडची पदवी मिळवलेली आहे. तालुक्याबाहेर अर्ज करून त्याने नियमाचे उल्लंघन तर केलेच शिवाय खोट्या माहितीआधारे फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो.