शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

कोल्हापुरी बंधा-यांना गरज ९५०१ गेटची; खरेदी केले १२९५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:06 AM

जिल्ह्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानंतरही केवळ गेट नसल्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यास जिल्हा परिषद सिंचन विभागाला यश आले नाही.

विजय सरवदे ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यानंतरही केवळ गेट नसल्यामुळे कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्यास जिल्हा परिषद सिंचन विभागाला यश आले नाही. त्यामुळे मंत्रालयीन पातळीवर पाठपुरावा करून जलयुक्त शिवार योजनेचा लाभ मिळालेल्या गावांच्या हद्दीतील बंधाºयांना गेट उपलब्ध करण्यास जिल्हा परिषदेला यश आले. असे असले तरी २९६ बंधा-यांना ९ हजार ५०१ एवढे गेटची आवश्यकता असून, आतापर्यंत जलयुक्त शिवार योजनेतून केवळ १ हजार २९५ गेट खरेदी करण्यात आलेले आहेत.यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, जिल्ह्यात ५८५ मोठे कोल्हापुरी बंधारे आहेत. यापैकी २८९ बंधाºयांना गेट आहेत. उर्वरित २७१ बंधाºयांना प्रत्येकी एक-दोन गेट आहेत, तर २५ बंधाºयांना एकही गेट नाही. जिल्ह्यातील २९६ कोल्हापुरी बंधाºयांसाठी १८ हजार ४०७ गेट बसविण्याची गरज आहे. यापैकी जिल्हा परिषदेकडे ८ हजार ९७६ गेट उपलब्ध आहेत. उर्वरित ९ हजार ५०१ गेटची बंधाºयांसाठी आवश्यकता आहे.गेटसाठी दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने जि.प. उपकरातून अडीच कोटी रुपयांची तरतूद केली होती; परंतु सुरुवातीला काही दिवस पुरवठादार संस्थांकडून प्रतिसाद मिळाला नाही, गेल्या वर्षी एक पुरवठादार संस्था पुढे आली; पण सर्वसाधारण सभेने गेट खरेदीचा प्रस्तावच रद्द केला. त्यामुळे गेट खरेदीचा मुद्दा गुंडाळला गेला.दरम्यानच्या कालावधीत कोल्हापुरी बंधाºयांत साचलेले पावसाचे पाणी केवळ गेट नसल्यामुळे वाहून गेले. ही बाब लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासन स्तरावर चर्चेत गेल्यामुळे जिल्हा परिषदेचे वाभाडे निघाले.त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने ज्या गावांत जलयुक्त शिवार योजनेचा लाभ मिळाला आहे, अशा गावांच्या शिवारातील बंधाºयांना जलयुक्त शिवार योजनेतून गेट खरेदी करण्याचा मुद्दा लावून धरला, शासनाने तो मान्य केला आणि मागील तीन वर्षांच्या आराखड्यातून १ हजार २९५ गेट खरेदी करण्यात आले. बंधाºयांना गेट बसविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे.जिल्ह्यातील ४७ गेटमध्ये स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्लगिंग (बंधाºयांमध्ये दीड मीटर एवढी भिंत उभी करणे) करण्यात आले. त्यामुळे या गेटसाठी लागणारे आता ९८९ गेट खरेदी करण्याची गरज नाही. तथापि, सन २०१८-१९ मध्ये १ हजार ५४ गेट खरेदी करण्याचा प्रस्ताव लवकरच सादर केला जाणार आहे.उर्वरित ६ हजार १६३ गेटसाठी साडेपाच कोटी रुपयांच्या निधीची गरज असून, त्यासाठी एक तर जिल्हा परिषदेचा उपकर किंवा जिल्हा नियोजन समितीकडे निधीच्या मागणीचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे.बंधाºयांमुळे १५,३४४ हेक्टर सिंचन क्षमतायासंदर्भात जि.प. सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता राठोड म्हणाले की, जिल्ह्यात सध्या २८९ कोल्हापुरी बंधाºयांना गेट असल्यामुळे त्याद्वारे ९ हजार ३०० हेक्टर एवढे क्षेत्र सिंचनाखाली येईल.एकूण ५८५ कोल्हापुरी बंधाºयांमध्ये गेट बसवून पाणी अडविल्यास तब्बल १५ हजार ३४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकते. गेट उपलब्ध करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

टॅग्स :DamधरणAurangabadऔरंगाबादzpजिल्हा परिषद