शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

किशनचंद तनवाणी म्हणजे सत्तेच्या ढेपेला लागलेला मुंगळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 12:24 IST

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत कराड यांची जोरदार टीका

ठळक मुद्देतनवाणी यांच्या जाण्याने काहीही परिणाम होणार नसल्याचा दावा  

औरंगाबाद : भाजपचे माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी पुन्हा शिवसेनेत केलेला प्रवेश भाजपच्या जिव्हारी लागला असून तनवाणी म्हणजे सत्तेच्या ढेपेला लागलेल्या मुंगळ्याप्रमाणे पक्ष बदलत असल्याची टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी गुरुवारी लोकमतशी बोलताना केली. तर शहराध्यक्ष संजय केणेकर म्हणाले, तनवाणींच्या पक्ष सोडण्यामुळे भाजपऐवजी शिवसेनेवरच जास्त परिणाम होईल.

डॉ. कराड म्हणाले, तनवाणी यांना भाजपने २०१४ साली मध्य मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारी दिली. त्यात ते पराभूत झाले. त्यानंतर पक्षाने त्यांना शहराध्यक्ष केले. २०१५ साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत त्यांच्या भावाला व मुलाला नगरसेवकपदाची संधी दिली. त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला. साडेचार वर्षांच्या काळात एवढे काही देऊनही त्यांनी पक्ष सोडला. सत्तेच्या मोहापायीच ते भाजपमध्ये आले होते आणि सत्तेच्या मोहापायीच ते शिवसेनेत गेल्याचे स्पष्ट होत आहे. त्यांची कृती सत्तेच्या ढेपेला लागलेल्या मुंगळ्याप्रमाणे  आहे. 

शहराध्यक्ष केणेकर म्हणाले, भाजपचे सेवेचे राजकारण सोडून तनवाणी यांनी सत्तेसाठी शिवसेनेत प्रवेश केला; परंतु त्यांच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येणार आहे. शिवसेना नेहमी सत्तेचे गणित करीत आली आहे. तनवाणी यांच्या व्यक्तिमत्त्वाला उंची मिळण्याची संधी भाजपमध्ये होती. त्यांना शिवसेनेत अनेकांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. आमच्या पक्षातील इतर कुणीही तनवाणी यांच्यासोबत जाणार नाही. याचा भाजपऐवजी शिवसेनेवर परिणाम होईल. कारण त्यांना बºयाच जणांचा विरोध होऊ शकतो, असेही केणेकर यांनी नमूद केले. 

जे त्यांच्यासोबत आले तेच जातीलतनवाणी यांच्यासोबत शिवसेनेत काही माजी नगरसेवकांपैकी पूर्व मतदारसंघातील एक किंवा दोन जण पक्षात जातील. भाजपची एखादी विद्यमान नगरसेविका जाऊ शकेल. १० ते १२ नगरसेवक तनवाणींसोबत असे बोलले जात आहे. परंतु तसे काहीही होणार नाही, असल्याने केणेकर यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Kishanchand Tanvaniकिशनचंद तनवाणीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका