शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दागिन्यांसाठी ८ वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न; भिक्षेकरी महिलांच्या वेषातील टोळीचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 17:15 IST

भविष्य सांगणाऱ्या भोंदूबाबांच्या रॅकेटपाठोपाठ दुसरी घटना; भिक्षेकरी महिलांच्या वेषातील टोळीचा पर्दाफाश. मूर्तिजापूरमध्ये जमावाकडून मारहाणीचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने भोंदूबाबांनी नागरिकांना मृत्यूची भीती दाखवून नागरिकांना लुटले. ही घटना ताजी असतानाच आता महिलांच्या टोळ्या खेळणाऱ्या लहान मुलांना हेरून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटण्यासाठी पीठ, अन्न मागत फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संतप्त जमावाने महिलांना पकडल्यानंतर स्थानिक पदाधिकारी, पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने भिक्षेकरी महिलांना मारहाण टळली. रविवारी सायंकाळी धूत रुग्णालयासमोरील मूर्तिजापूरमध्ये या घटनेनंतर मुलांना पळवणारी टोळी आल्याच्या चर्चेने पालक भयभीत झाले.

एन-६ मधील एक महिला रविवारी दुपारी मूर्तिजापूरमधील मावशीला भेटायला गेली. सायंकाळी ४.३० वाजता त्यांची ८ वर्षाची मुलगी परिसरात खेळत असताना अचानक एका भिक्षेकरी महिलेने तिचा हात पकडून निर्मनुष्य परिसरात नेण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने महिलेच्या हाताला झटका देऊन रडतच घराकडे पळ काढला. कुटुंबाला ही बाब समजताच रहिवासी जमा झाले. तेवढ्यात भिक्षेकरी महिलांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी पाठलाग करून त्यांना पकडले.

मुलीला पकडल्याची टोळीची कबुलीस्थानिकांनी महिलांचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून मारहाणीचा प्रयत्न केला. घटनेची माहिती कळताच नगरसेवक मनोज गांगवे, स्थानिक पदाधिकारी दीपक खोतकर यांनी जमावाला शांत करून पोलिसांना बोलावले. एमआयडीसी सिडको पोलिसांनी धाव घेत भिक्षेकरी महिलांना ठाण्यात नेले. ठाण्यात भिक्षेकरी महिलेने मुलीला नेत असल्याची कबुली दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

साबुदाणा खिचडीचा बहाणास्थानिकांच्या माहितीनुसार, पकडलेल्या महिलांची टोळी काही दिवसांपासून बीड बायपास परिसरात झोपडी टाकून राहते. रविवारी दुपारपासून त्या परिसरात घरोघरी जेवण, पीठ मागत फिरत सोन्याचे दागिने परिधान केलेली लहान मुले हेरत होत्या. एका लहान मुलीला मंदिरात साबुदाणा खिचडीचे वाटप सुरू असल्याचे सांगून त्यांनी सोबत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या महिला साथीदार पकडल्या गेल्याचे समजताच त्यांनी परस्पर पळ काढला. ८ वर्षांच्या मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रात्री उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरू होती.

English
हिंदी सारांश
Web Title : Kidnapping attempt on 8-year-old for jewelry foiled; gang exposed.

Web Summary : A beggar gang in Sambhajinagar attempted to kidnap an 8-year-old girl for her jewelry. Locals caught the women after the girl escaped, preventing a potential assault. Police intervened, and the gang confessed to targeting children for their gold ornaments under the guise of begging for food.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर