शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी मनसे उतरली रस्त्यावर

By admin | Updated: May 24, 2014 01:38 IST

घनसावंगी : शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घनसावंगी येथे शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

घनसावंगी : शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घनसावंगी येथे शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. घनसावंगी तालुक्यातील ५२ गावे गारपिटग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात आली. ती गावे पुन्हा समाविष्ट करण्यात यावी, प्रलंबित एक्स्प्रेस काल्याची मागणी पूर्ण करावी, शेतकर्‍यांना पीककर्ज तात्काळ उपलब्ध करून द्यावे, रास्त भावाने खते व बी-बियाणे उपलब्ध करून द्यावेत, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष सुनील आर्दड यांनी केले. आंदोलनात सहभागी झालेल्या काही कार्यकर्त्यांनी मुंडण करून, शासनाचा निषेध नोंदविला. यावेळी बोलताना आर्दड म्हणाले की, निवडणुका आल्या की राज्यकर्ते आश्वासनाची खैरात वाटतात, परंतु प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय शासन घेत नाही. घनसावंगी तालुक्यातील ५२ गावे प्रशासनाने पंचनामे करण्यापासून वगळली आहेत. ही गावे पुन्हा समाविष्ट करून शेतकर्‍यांना गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यात यावी. यावेळी तालुकाध्यक्ष अंकुश बोबडे, बळीराम खटके, गणेश बोराडे, हिराताई जाधवर, दिलीप राऊत, एकनाथ राठोड, दिगंबर आर्दड, भरत कंटुले, कैलास चौधरी, प्रकाश गहिरे, दिगंबर उगले, अर्जुन माळोदे, दिलीप पाटेकर, हरिभाऊ तांगडे, संतोष सोसे, अर्जुन थेटे, अर्जुन जाधव, सागर पवार, संजय सोळंके, कानिफनाथ सावंत, सुभाष परदेशी, बंडू उपाध्ये, विलास भुतेकर, कृष्णा कवडे, विठ्ठल आटोळे, कृष्णा पिसोरे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)