खुलताबाद न.प.चा पाणीपुरवठा सिंचन विभागाकडून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:04 IST2021-03-31T04:04:46+5:302021-03-31T04:04:46+5:30

खुलताबाद : गिरिजा मध्यम प्रकल्पातून खुलताबाद शहराला होणारा पाणीपुरवठा पाटबंधारे सिंचन विभागाने पाण्याचा टॅक्स न भरल्यामुळे मंगळवारी दुपारी तीन ...

Khultabad NP water supply closed by Irrigation Department | खुलताबाद न.प.चा पाणीपुरवठा सिंचन विभागाकडून बंद

खुलताबाद न.प.चा पाणीपुरवठा सिंचन विभागाकडून बंद

खुलताबाद : गिरिजा मध्यम प्रकल्पातून खुलताबाद शहराला होणारा पाणीपुरवठा पाटबंधारे सिंचन विभागाने पाण्याचा टॅक्स न भरल्यामुळे मंगळवारी दुपारी तीन वाजता बंद केला. यामुळे खुलताबादकरांना पुन्हा एकदा कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.

खुलताबाद शहराला तालुक्यातील येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. पाटबंधारे सिंचन विभागाच्या अखत्यारित असलेला गिरिजा मध्यम प्रकल्पातून नगर परिषद घेत असलेल्या पाण्याच्या पोटी कर घेतला जातो. खुलताबाद नगर परिषदेकडे पाटबंधारे सिंचन विभागाचे पाण्याच्या करापोटी साडेआठ लाख रुपये थकले आहेत. मध्यंतरी नगर परिषदेने एक लाख रुपये पाटबंधारे सिंचन विभागाकडे जमा केले होते. मात्र, आणखी पैसे भरण्याचा तगादा पाटबंधारे विभागाने लावला होता. मार्चअखेरपर्यंत कुठलीच रक्कम नगर परिषद भरत नसल्याचे पाहून सिंचन विभागाने गिरिजा मध्यम प्रकल्पातील नगर परिषदेच्या पाणी उपसा करणाऱ्या पंप हाऊसला मंगळवारी दुपारी ३ वाजता कुलूप ठोकले. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. यामुळे न.प. नागरिकांना पाणीपुरवठा कसा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फोटो कॅप्शन : खुलताबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरिजा मध्यम प्रकल्पातील पंप हाऊसला कुलूप ठोकताना पाटबंधारे सिंचन विभागाचे अधिकारी व कर्मचारी.

300321\sunil gangadhar ghodke_img-20210330-wa0041_1.jpg

खुलताबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरिजा मध्यम प्रकल्पातील पंप हाऊसला कुलूप ठोकतांना पाटबंधारे सिंचन विभागाचे अधिकारी व कर्मचारी.

Web Title: Khultabad NP water supply closed by Irrigation Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.