खवणेपिंपरीत सिंह यांनी ठोकला मुक्काम

By Admin | Updated: June 17, 2014 00:38 IST2014-06-17T00:19:33+5:302014-06-17T00:38:33+5:30

सेलू: प्रशासन आपल्या दारी या उपक्रमांंतर्गत जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह त्यांनी तालुक्यातील खवणे पिपंरी या गावात ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थांशी संवाद साधत १३ जून रोजी मुक्काम ठोकला़

Khanna pumps in front of Singh | खवणेपिंपरीत सिंह यांनी ठोकला मुक्काम

खवणेपिंपरीत सिंह यांनी ठोकला मुक्काम

सेलू: प्रशासन आपल्या दारी या उपक्रमांंतर्गत जिल्हाधिकारी एस़ पी़ सिंह त्यांनी तालुक्यातील खवणे पिपंरी या गावात ग्रामसभा आयोजित करून ग्रामस्थांशी संवाद साधत १३ जून रोजी मुक्काम ठोकला़ गावातील विविध समस्या जाणून घेत शासनाच्या विविध योजनांची ग्रामस्थांना माहिती या उपक्रमांतर्गत देण्यात आली़
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी धनराज निला, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, जिल्हा उपनिबंधक एस़ एस़ सागर, उपजिल्हाधिकारी चिंचकर, तहसीलदार पांडुरंग माचेवाड, आसाराम छडीदार, पोलिस निरीक्षक एऩ पी़ ठाकूर, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त खुशाल गायकवाड, गटविकास अधिकारी प्रताप जाधव, तालुका कृषी अधिकारी राम रोडगे, एस़ बी़ आयचे शाखा व्यवस्थापक के़ वेंकटरमन, हैदराबाद बँकेचे मिलिंद अभ्यंकर, जिल्हा बँकेचे एस़ के़ पाटील, विस्तार अधिकारी तुळशीराम राठोड आदी उपस्थित होते़ गावच्या सार्वजनिक विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र यावे, असे सिंह यांनी सांगितले़ विविध समस्या त्यांनी जाणून घेतल्या नंतर संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ समस्या सोडविण्याचे आदेश त्यांनी दिले. अवैध देशी दारू विक्री, पाणीटंचाई, शेत रस्ते, पाणंद रस्ते, डी़आऱडी़ चे कार्ड, स्मशानभूमी या समस्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ग्रामस्थांनी मांडल्या़ विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसाठी असलेल्या शासनाच्या योजनेबाबत माहिती दिली़
प्रास्तविक सुभाष चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे तर ग्रामविकास अधिकारी आऱ डी़ काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी सरपंच महादेव शिंदे, उपसरपंच महादेव चव्हाण आदींनी पुढाकार घेतला़ कार्यक्रमास नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रात्री साडेअकरा पर्यंत ग्रामसभा झाली़ यावेळी विविध समस्या ग्रामस्थांनी मांडल्या त्या सोडविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. ग्रामसभे नंतर जिल्हाधिकारी सिंह यांनी ग्रामपंचायत कार्यालयात मुक्काम केला. त्यांनी शाळेला भेट ही दिली़

Web Title: Khanna pumps in front of Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.