शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
3
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
4
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
5
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
6
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
7
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
8
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
9
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
10
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
11
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
12
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
13
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
14
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
15
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
16
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
17
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
18
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
19
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
20
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
Daily Top 2Weekly Top 5

दहा गावास केरोसीन परवाने

By admin | Updated: July 26, 2014 00:36 IST

विठ्ठल भिसे, पाथरी परभणी जिल्ह्यात मागील सहा महिन्यापूर्वी स्वयंसहाय्यता गटांना रास्त भाव दुकाने आणि किरकोळ केरोसीन परवाने मंजूर करण्यात आले होते.

विठ्ठल भिसे, पाथरीपरभणी जिल्ह्यात मागील सहा महिन्यापूर्वी स्वयंसहाय्यता गटांना रास्त भाव दुकाने आणि किरकोळ केरोसीन परवाने मंजूर करण्यात आले होते. पहिल्या टप्प्यात हा प्रयोग यशस्वी ठरल्याने आता महसूल प्रशासनाने पुन्हा स्वयंसहाय्यता बचत गटांना रास्त भाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने देण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली असून यामध्ये पाथरीतील दहा गावांचा समावेश आहे. जिल्हा पुरवठा विभागांतर्गत रास्त भाव दुकाने आणि किरकोळ केरोसीन परवाधारकांना धान्य आणि केरोसीन वाटप केले जाते. शासनाने मागील काही वर्षात स्वस्त धान्य दुकानदारामार्फत लाभार्थ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या. दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, अंत्योदय, एपीएल, बीपीएल तसेच अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थी यांना योजनेचा लाभ देण्यात येतो. जिल्ह्यात सहा महिन्यापूर्वी निलंबित आणि रद्द असलेल्या रास्त भाव दुकान व किरकोळ केरोसीन परवाने कायमचे रद्द करून त्या ठिकाणी स्वयंसहाय्यता बचत गटांना परवाने देण्याची प्रक्रिया सुरू केली. सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत रास्त भाव दुकान व किरकोळ केरोसीन परवाने जाहीरनामे काढून वाटप करण्यात आली. पहिल्या टप्प्यात पाथरी तालुक्यात स्वयंसहाय्यता बचत गटांना मान्यता दिल्यानंतर या बचत गटाकडून वितरण व्यवस्था सुरळीत पार पडत असल्याचे महसूल प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर आता उर्वरित परवाने देण्यासाठी जाहीर प्रगटन काढण्यात आले आहेत. यामुळे रद्द झालेली दुकाने आता त्या त्या गावच्या स्वयंसहाय्यता बचत गटाना वितरण व्यवस्थेसाठी मिळणार असल्याची माहिती आहे. किरकोळ केरोसीन परवान्यासाठी गावेकासापुरी, लोणी बु., बाभळगाव, बानेगाव, मंजरथ, पाथरी-१, पाथरी-२, सारोळा खू., पोहेटाकळी, मरडसगाव यांचा समावेश आहे. १० आॅगस्टपासून कारवाई पाथरी तालुक्यातील दहा गावच्या किरकोळ केरोसीन परवान्यासंदर्भात १० आॅगस्टपासून कारवाई सुरू केली जाणार आहे. त्यानंतर १५ ते ३० आॅगस्ट दरम्यान अर्ज मागविणे, १ ते १५ सप्टेंबर या कालावधीत महिला ग्रामसभेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव दाखल करणे आणि २५ सप्टेंबरपर्यंत जिल्हा पुरवठा कार्यालयामध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याचा कार्यक्रम आहे. महिला ग्रामसभेकडे होतेय दुर्लक्षसार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये रास्त भाव दुकाने आणि किरकोळ केरोसीन परवाने स्वयंसहाय्यता बचत गटांना देण्याचा निर्णय झाल्यानंतर गावस्तरावरून प्राप्त झालेले अर्ज महिला ग्रामसभेकडे मंजुरीसाठी पाठविणे अनिवार्य करण्यात आले असले तरी मागील परवाने देत असताना महिला ग्रामसभेची शिफारस अनेक बचत गटांना फायदेशीर ठरू शकली नाही किंवा बचत गटांंना महिला ग्रामसभेमुळे जादा गुणही देण्यात आले नाहीत. यामुळे महिला ग्रामसभेची शिफारस केवळ नावापुरतीच घेतली जाते की, काय? अशी शंकाही उपस्थित केली जाऊ लागली आहे.