शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

सिल्लोडमध्ये 'केरळ पॅटर्न'; धोत्रा झेडपी शाळेत 'बॅकबेंचर्स'ला पूर्णविराम, ‘ढ’ विद्यार्थी हुशार होणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 14:09 IST

धोत्रा जिल्हा परिषद शाळेत ‘केरळ पॅटर्न’चा श्रीगणेशा; धोत्रा शाळेत आता या पारंपरिक बाकांची जागा अर्धवर्तुळाकार बैठकीने घेतल्याने विद्यार्थ्यांत याचे कमालीचे कुतूहल बघायला मिळाले.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड (जि. छत्रपती संभाजीनगर) : सर्व विद्यार्थ्यांसोबत संपूर्ण सुसंवाद व्हावा, कुठलाही विद्यार्थी ‘ढ’ राहू नये, या उद्देशाने साकारलेल्या ‘केरळ पॅटर्न’ची जादू आपल्याकडील जि. प. शाळांनाही भावली आहे. सिल्लोड तालुक्यातील धोत्रा या छोट्याशा गावातील जि. प. प्राथमिक शाळेने याचा श्रीगणेशाच करून टाकल्याने याचे शैक्षणिक वर्तुळात कौतुक होत आहे.

राज्य आदर्श शिक्षिका सरला कामे (कुमावत) यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली असून, दि. १५ जुलैपासून शाळेत नव्या पद्धतीने अध्यापन सुरू झाले आहे. ‘बॅकबेंचर्स’ला आता पूर्णविराम मिळाल्याने ही फक्त आठवणीत राहणार आहे. धोत्रा शाळेत आता या पारंपरिक बाकांची जागा अर्धवर्तुळाकार बैठकीने घेतल्याने विद्यार्थ्यांत याचे कमालीचे कुतूहल बघायला मिळाले.

या संकल्पनेमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक सुलभ होणार असून, मागे बसणाऱ्या व दुर्लक्षित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचाही अभ्यासात सक्रिय सहभाग वाढणार आहे. ही अभिनव कल्पना शिक्षणातील समानता आणि सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. ही संकल्पना केरळमधील अनेक शाळांमध्ये आधीच राबवली गेली असून, मल्याळम चित्रपट ‘8th Standard’ मधून यास प्रेरणा मिळाली आहे.

बदल छोटा, परिणाम मोठा...हा बदल छोटा असला तरी त्याचा परिणाम नक्कीच खूप मोठा होणार आहे. ‘बॅकबेंचर्स’ म्हणून ओळखले जाणारे विद्यार्थी ग्रामीण भागात ‘ढ’ म्हणून ओळखले जातात. ते आता शैक्षणिक प्रवाहात मागे पडू नयेत, म्हणूनच ही बैठक पद्धती शैक्षणिक समावेशासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. वर्गातील प्रत्येक विद्यार्थी केंद्रस्थानी यावा, याकरिता हा प्रयोग शिक्षणाच्या न्याय्य आणि सहभागी प्रक्रियेला चालना देणारा आहे.

ही अभिनव कल्पना शिक्षणातील समानता आणि सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणारी आहे. विद्यार्थ्यांची संख्या कमी असेल, तर प्रत्येक शिक्षकाने आपल्या शाळेत हा प्रयोग नक्कीच करावा.- सरला कामे (कुमावत), राज्य आदर्श शिक्षिका, जि. प. प्रा. शाळा धोत्रा, जि. छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEducation Sectorशिक्षण क्षेत्र