शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

कँटीनचालकाची विद्यार्थ्यास मारहाण

By admin | Updated: December 22, 2015 00:12 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सायन्स कँटीनमधील कामगारांनी एका विद्यार्थ्यास सोमवारी मारहाण केल्यामुळे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सायन्स कँटीनमधील कामगारांनी एका विद्यार्थ्यास सोमवारी मारहाण केल्यामुळे संतापलेल्या सुमारे तीनशे- साडेतीनशे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करीत तीन तास मुख्य इमारतीसमोर ठिय्या आंदोलन केले. मारहाण करणाऱ्यांना अटक होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती अशी की, सायन्स कँटीनचा ठेका काही दिवसांपूर्वी मिळालेला कँटीनचालक निविदेत नमूद केलेल्या दरापेक्षा अधिक दराने चहा आणि खाद्यपदार्थ विक्री करीत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार होती. याबाबत काही कुरबुरीही झाल्या होत्या.सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास दरपत्रकाप्रमाणे पदार्थ विक्री करीत नसल्याबद्दल तक्रार करणाऱ्या गौतम जाधव (बायोकेमिस्ट्री विभाग) या विद्यार्थ्याला कँटीनमधील काही कामगारांनी जबर मारहाण केली. हा विद्यार्थी एसएफआयचा कार्यकर्ता आहे. विद्यार्थ्याला मारहाण झाल्याचे समजताच विविध विभागांतील तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी तिकडे धाव घेतली. नंतर सर्व विद्यार्थ्यांनी विद्यापीठ मुख्य इमारतीसमोर येऊन मारहाणीचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या तसेच विद्यार्थी कल्याण संचालक विभागाच्या विरोधातही घोषणा दिल्या. विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे तसेच प्रभारी कुलसचिव डॉ. एम. डी. शिरसाठ हे विद्यार्थ्यांना समजावण्यासाठी आले, मात्र विद्यार्थी त्यांचे काही एक ऐकायला तयार नव्हते. सुमारे चार तास ठिय्या आंदोलन चालले. पाच वाजेच्या सुमारास पोलीस आले. यावेळी पोलिसांनीही विद्यार्थ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, विद्यार्थ्यांकडून मारहाण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी होत राहिली. सायंकाळी सव्वासात वाजेपर्यंत हे आंदोलन चालले. पोेलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.