शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णेत केबीसीने शेकडो लोकांना गंडविले

By admin | Updated: July 24, 2014 00:22 IST

पूर्णा : केबीसी या नाशिक येथील अर्थव्यवहार करणाऱ्या कंपनीत हजारो लोकांनी पैसे गुंतविले आहेत. शेकडो सुशिक्षित नागरिक या जाळ्यात फसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

पूर्णा : केबीसी या नाशिक येथील अर्थव्यवहार करणाऱ्या कंपनीत हजारो लोकांनी पैसे गुंतविले आहेत. शेकडो सुशिक्षित नागरिक या जाळ्यात फसल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. चार वर्षांपासून केबीसीचे आर्थिक व्यवहार सुरू आहेत. सहा महिन्यांत दुप्पट पैसे देण्याच्या लालसेने सामान्य नागरिकांसह अनेक सुशिक्षितांनी या कंपनीत पैसे गुंतविले आहेत. भाऊसाहेब चव्हाण यांनी कृष्णा भाऊसाहेब चव्हाण अर्थात केबीसी नावाची आर्थिक व्यवहार कंपनी सुरू केली. नाशिकसह औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड यासह विदर्भातही जिल्हास्तरावर अनेक एजंट तयार झाले. या एजंटाच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी खाजगी शाळांमधील शिक्षक, जि़ प़ चे कर्मचारी यांच्यासह अनेक लोकांनी दुप्पट पैशाच्या आमिषाला बळी पडून लाखो रुपये गुंतविले आहेत. कोन बनेगा करोडपती या नावाचा संदर्भ घेऊन केबीसी कंपनी स्थापण्यात आली होती. दुप्पट पैशाच्या अमिषाला बळी पडून पूर्णा व खुजडा, देऊळगाव दुधाटे, चुडावा, माखणी, गोळेगाव, वझूर, ताडकळस, पांढरी, कावलगाव यासह अनेक गावातील नागरिकांनी स्वत:च्या जमिनी, नोकरीतील पैसे, दागिणे गहाण ठेऊन केबीसी या कंपनीत पैसे गुंतविले आहे. मागील सहा महिन्यांपासून दुप्पट पैसे तर आलेच नाही, परंतु एजंटांनी पैसे येणार या नावाखाली गुंतवणूक सुरू ठेवली होती. कंपनी बंद पडल्याचे लक्षात आल्यावर अनेक गुंतवणूकदार जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे जाऊन आले. त्यापैकी काही लोकांनी तक्रार दाखल केली. परंतु शेकडो लोकांनी अजून तक्रारी दाखल केल्या नाहीत. कंपनी सुरू होईल, या आशेपायी अनेक लोक तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे येत नसल्यामुळे शहर व तालुक्याचा गुंतवणुकीचा किती आकडा आहे, हे समजू शकत नाही. (वार्ताहर)