कौल कुणाला; आज मतमोजणी
By Admin | Updated: June 24, 2014 01:09 IST2014-06-24T01:04:49+5:302014-06-24T01:09:39+5:30
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात दि. २० जून रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील कलाग्रामला लागून असलेल्या सभागृहात मंगळवारी (दि. २४) सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे.

कौल कुणाला; आज मतमोजणी
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात दि. २० जून रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी चिकलठाणा औद्योगिक परिसरातील कलाग्रामला लागून असलेल्या सभागृहात मंगळवारी (दि. २४) सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. प्रशासनाने मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून, मतमोजणीची रंगीत तालीमही सोमवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत घेण्यात आली.
मतमोजणीसाठी ५६ टेबल लावण्यात आलेले आहेत. पहिल्या पसंतीत कोटा पूर्ण न झाल्यास इतर ११ राऊंडमध्ये दुसऱ्या पसंतीची मते मोजली जाणार आहेत. यावेळी केंद्रीय निवडणूक निरीक्षक येवले, निवडणूक निर्णय अधिकारी संजीव जयस्वाल यांच्यासह आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे.
अंतिम आकडेवारी अशी :
एकूण मतदार -३ लाख ७९ हजार ३५६
एकूण झालेले मतदान - १ लाख ४२ हजार १३६
महिला मतदार-१८ हजार ९०६
पुरुष मतदार-१ लाख ३२ हजार २३०
असा ठरणार कोटा
अवैध ठरलेली मते व नोटाला पडलेली मते बाद करून उर्वरित मतास दोनने भागले जाईल. येणाऱ्या भागाकारात एक मिळवून येणारी संख्या हा पहिल्या पसंतीचा कोटा निश्चित होईल.
उदा. एकूण झालेली मते एक लाख. त्यात नोटाला ५ हजार आणि अवैध मते ५ हजार ठरली. ही १० हजार मते बाद केल्यानंतर ९० हजार मते शिल्लक राहतात. त्याला दोनने भागल्यास ४५ हजार भागाकार येतो. त्यात १ मिळवून येणारी संख्या ४५००१ हा कोटा असेल.