ट्रॅक्टर अडविल्यावरून कुऱ्हाडीने मारहाण
By Admin | Updated: August 22, 2016 01:13 IST2016-08-22T00:58:25+5:302016-08-22T01:13:35+5:30
तामलवाडी : शेतात जाणारा ट्रॅक्टर का अडविला या कारणावरून दोघाजणांनी एकास कुऱ्हाडी व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची

ट्रॅक्टर अडविल्यावरून कुऱ्हाडीने मारहाण
तामलवाडी : शेतात जाणारा ट्रॅक्टर का अडविला या कारणावरून दोघाजणांनी एकास कुऱ्हाडी व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना तुळजापूर तालुक्यातील पांगरधरवाडी येथे शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, इकबाल विक्रम सय्यद हे शनिवारी सायंकाळी जिल्हा परिषद शाळेसमोर उभे होते. यावेळी रज्जाक व अफजल सय्यद यांनी त्यांना शेतात कामासाठी ट्रॅक्टर का येऊ देत नाहीस असे विचारले असता आमची जमीन वाटणी योग्य झाली नाही, अर्धा एकर जमीन तुमच्याकडे आहे. शेताची मोजणी झाल्यानंतर ट्रॅक्टरने शेत नांगरून घ्या, असे त्यांनी सांगितले. यावर या दोघांनी इकबाल सय्यद यांना काठी-कुऱ्हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी जखमी इकबाल सय्यद (रा. पांगरधरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रज्जाक सय्यद व अफजल सय्यद यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला असून, तपास पोहेकॉ जयराम राठोड हे करीत आहेत.