शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

मदतीची प्रतीक्षाच; नुकसान भरपाईपासून १७ लाख शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 2:35 PM

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्दे दुसऱ्या टप्प्यातील अनुदान पुढील वर्षात मिळण्याची शक्यता  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला.

औरंगाबाद : अतिवृष्टीत झालेल्या नुकसान भरपाईपासून मराठवाड्यातील १७ लाख शेतकरी वंचित आहेत. पहिल्या टप्प्यात आलेले १३३६ कोटींचे अनुदान २१ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले आहे. दुसऱ्या टप्प्यातील अनुदान एनडीआरएफच्या पाहणीनंतर मिळण्याची शक्यता आहे. १७ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर त्यानंतरच मदत जमा होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली. 

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी मिळणाऱ्या दुसऱ्या टप्प्यातील अनुदानाची प्रतीक्षा आहे. पहिल्या टप्प्यातील अनुदान वाटप नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात झाले. त्यातील काही अनुदान अजून वाटप झालेले नाही. बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच अनुदान वाटप करु अशी घोषणा सरकारने केली होती. मात्र विभागात १ हजार ३३६ कोटी ८९ लाख २३ हजार रुपयांचा पहिला हप्ता सरकारने दिला. विभागातील ३७ लाख ९५ हजार शेतकरी अनुदानाची वाट पाहत आहेत. रबी हंगामातील पेरण्या सुरु झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील १३३६ कोटी रुपयांचे अनुदान सुमारे २१ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप करण्यात आले, म्हणजे अद्यापही तब्बल १७ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अनुदान गेलेले नाही. जून ते सप्टेंबर तसेच ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला.  

शेतीव्यतिरिक्त इतर नुकसान सरत्या वर्षात झालेल्या अतिवृष्टीने ६७ नागरिकांचा आणि ८०० लहान-मोठ्या जनावरांचा बळी घेतला आहे. अतिवृष्टीने शेतीमालाचे नुकसान केलेच शिवाय जीवितहानी देखील केली. विभागातील औरंगाबादमधील १५, जालना १४, परभणी ५, हिंगोली २, नांदेड ११, बीड ८, लातूर ९ तर उस्मानाबादमधील ३ नागरिकांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. ४२० मोठे दुधाळ जनावरे अतिवृष्टीत दगावली. लहान १०१ तर ओढकाम करणारे २३८ जनावरे मृत्युमुखी पडली. २ हजार ३० कुटुंबांचा संसार अतिवृष्टीमध्ये वाहून गेला.  ४ हजार ३१८ कच्च्या घरांचेही नुकसान झाले आहे. तर १९६ पक्क्या घरांची पडझड झाली आहे. जनावरांचे १५३ गोठे नष्ट झाले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRainपाऊसfundsनिधी