शहरं
Join us  
Trending Stories
1
“माझा हक्क आहे, पण विरोधी पक्षनेता असूनही संसेदत बोलू दिले जात नाही”; राहुल गांधींचा आरोप
2
झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार
3
'ट्रम्प यांनी २४ वेळा...', ऑपरेशन सिंदूरबाबत खरगेंच्या विधानावर जेपी नड्डा संतापले, म्हणाले...
4
Ganeshotsav 2025 Train: गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून?
5
अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'वर! छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश
6
"मी २५ वर्षं आमदार, १० वर्ष लोकसभेचा खासदार...!"; छावाचे कार्यकर्ते आले, पत्ते टाकले, नंतर काय घडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
7
अजित पवारांनी मौन सोडले पण कारवाईवर भाष्य टाळलं; "मारहाणीची घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी..."
8
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
9
श्रावणात नैवेद्याच्या ताटाची लज्जत वाढवेल 'हा' कोबीचा चटका; कमी साहित्यात चविष्ट रेसेपी 
10
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
11
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
12
ट्रम्प यांच्या धोरणाचा आता 'नासा'लाही फटका; 'या' कारणांमुळे उपग्रह काढले विक्रीला, तेही डिस्काउंटमध्ये?
13
घरात वीज, शौचालय नाही, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास...; भारताच्या लेकीचं जपानमध्ये कौतुक
14
IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
15
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
16
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
17
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
18
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
19
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
20
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...

बस दुकानात घुसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 00:44 IST

सिल्लोड शहरातील घटना : नालीत अडकल्याने मोठा अनर्थ टळला

सिल्लोड : एसटी बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस चक्क दोन दुकानांत घुसली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे रविवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.भगवान मंगथू चव्हाण (३५,रा.फदापूर तांडा, ता. सोयगाव, हल्ली मुक्काम मंगरुळ फाटा, सिल्लोड) असे या घटनेत जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. औरंगाबादहून जळगावकडे जाणाऱ्या एसटीबस चालकाचा बस (क्र. एम.एच. १४ बी.टी.१८१2) वरील नियंत्रण सुटल्याने बस वळविताना ही बस सरळ मुख्य रस्त्यावरील समय वॉच सेंटर व राजस्थान मिठाई या दुकानात घुसली. यावेळी दुकानात बसलेल्या एका जणाच्या पायाला दुखापत झाली, तर बाजार करून गावाकडे निघालेला भगवान मंगथू चव्हाण हा गंभीर जखमी झाला. तसेच या अपघातात रस्त्यावर उभ्या एका स्कूटरला धडक लागल्याने त्या स्कूटर्सचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षण बजरंग कुटुंबरे व पोलीस कर्मचारी करीत आहेत.नालीमुळे मोठी दुर्घटना टळली.एसटी बसस्थानकाच्या गेटमधून बाहेर पडल्यावर जळगावकडे वळविताना बसचालक भागवत राठोड यांचे बस वरील नियंत्रण सुटले. एसटी बस जळगाव रस्त्याकडे न वळता ती चक्क सरळ रस्त्यालगतच्या दुकांनात घुसली सुदैवाने दुकानांच्या समोर मोठी नाली होती, त्या नालीमुळे एसटी बस नालीत अडकली व मोठा अनर्थ टळला. रविवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने मोठ्या संख्येत नागरिकांची या रस्त्यावर रेलचेल असते. मात्र, अपघातप्रसंगी या रस्त्यावर जास्त गर्दी नसल्याने कुठलीही जीवित हानी झाली नाही.पादचारी व रिक्षाला वाचविण्याच्या प्रयत्नातून दुर्घटना.अण्णाभाऊ साठे चौकात नेहमीच पादचारी व प्रवासी रिक्षा तसेच काळी पिवळी गाड्या उभ्या असतात. यातच रस्त्यालगत दुभाजकाच्या जवळ उभ्या असलेल्या प्रवासी रिक्षाला वाचविताना एसटी बसचालकाला मोठे वळण घ्यावे लागले त्याचबरोबर रविवारचा आठवडी बाजार असल्याने पादचाºयांची संख्याही खूप जास्त असते. त्याचमुळे जीवितहानी टाळण्याच्या प्रयत्नात ही घटना घडली.- विजय बोरसे, आगारप्रमुख, सिल्लोड

टॅग्स :PoliceपोलिसBus Driverबसचालक