शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

जमादार चतुर्भुज

By admin | Updated: June 28, 2014 01:17 IST

उमरी : उमरी पोलिस ठाण्याचे जमादार भानुदास लोभाजी वैद्य यांना २७ जून रोजी ६ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ पोलिस निरीक्षकाच्या कक्षात

उमरी : उमरी पोलिस ठाण्याचे जमादार भानुदास लोभाजी वैद्य यांना २७ जून रोजी ६ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ पोलिस निरीक्षकाच्या कक्षातच हा प्रकार घडला़ या घटनेमुळे उमरी ठाणे नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे़उमरी, जि़ नांदेड येथील पोलिस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांनी ३० हजार रुपये लाचेची मागणी केल्यावरून त्यांच्याविरूद्ध २५ जून रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला़ तीन दिवस उलटत नाहीत तोच याच ठाण्यातील जमादार ६ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ बल्लाळ ता़ भोकर येथील तक्रारदाराचा मुलगा याच्याविरूद्ध उमरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल झालेला आहे़ यामध्ये तुझ्या मुलाला अटक करीत नाही व कोठडीत टाकत नाही, म्हणून जमादार वैद्य यांनी तक्रारदारास ६ हजार रुपयांची मागणी केली़ विशेष म्हणजे एसीबी नांदेडच्या पथकाने सदर ६ हजारांची लाच स्वीकारताना ठाण्यातील पोलिस निरीक्षकाच्या कक्षातच वैद्य यांना रंगेहाथ पकडले़ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक एम़जी़ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जी़ एस़ राहिरे, जमादार चंद्रकांत कदम, विठ्ठल खोमणे, शेख चांद व चालक कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली़ (वार्ताहर)पोलिस निरीक्षकाच्या कक्षातच लाच घेताना पकडले२५ जून रोजी पोलिस निरीक्षक विठ्ठल चव्हाण यांना लाच घेताना पकडले होतेउमरी पोलिस ठाणे आले चर्चेतअटक न करण्यासाठी पोलिस जमादाराने घेतली ६ हजारांची लाचतपास सुरु