कनिष्ठ लिपीक लाच स्वीकारताना जाळ्यात
By Admin | Updated: May 15, 2015 00:49 IST2015-05-15T00:40:08+5:302015-05-15T00:49:56+5:30
उदगीर : उदगीर तालुक्यातील महादेववाडी येथील गट नं़ १४२ मधील १ हेक्टर १७ आर जमीन खरेदी विक्रीच्या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने फेरफार मंजुरीचा आदेश

कनिष्ठ लिपीक लाच स्वीकारताना जाळ्यात
उदगीर : उदगीर तालुक्यातील महादेववाडी येथील गट नं़ १४२ मधील १ हेक्टर १७ आर जमीन खरेदी विक्रीच्या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने फेरफार मंजुरीचा आदेश वरिष्ठांकडून मंजूर करुन देण्याच्या कामासाठी लाचेची मागणी करणाऱ्या उदगीर तहसीलच्या कनिष्ठ लिपिकास गुरुवारी ३ हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहात पकडले़ याबाबत उदगीर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़
उदगीर तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपीक शिवराज वैजनाथ चिद्रे (४७) याने उदगीर तालुक्यातील महादेववाडी येथील गट नं़ १४२ मधील १ हेक्टर १७ आर जमीन खरेदी-विक्रीच्या प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने फेरफार मंजुरीचा आदेश मंजूर करुन देण्याच्या कामासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितली़ तडजोडीअंती ३ हजार रुपयांची रक्कम ठरली़ त्यानुसार गुरुवारी दुपारी उदगीर तहसील कार्यालयात लाच देण्याचे ठरले़ दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कनिष्ठ लिपिक शिवराज वैजनाथ चिद्रे यास ३ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले़ याबाबत उदगीर शहर पोलिसात चिद्रे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोनि भालेराव करीत आहेत़ (वार्ताहर)