मुलीला पळवून नेणाऱ्यास न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 22:27 IST2019-04-07T22:26:36+5:302019-04-07T22:27:21+5:30
अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा आरोपी प्रणयशील गजभिये (३०) याला रविवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू.पी. देवर्षी यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली.

मुलीला पळवून नेणाऱ्यास न्यायालयीन कोठडी
औरंगाबाद : धुणीभांडी करणाऱ्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा आरोपी प्रणयशील गजभिये (३०) याला रविवारी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यू.पी. देवर्षी यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. पोलिसांनी त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली.
पोलिसांनी आरोपीस भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातून शनिवारी (दि.६) रात्री अटक केली. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने वरीलप्रमाणे आदेश दिला.