दोन दिवसांपासून जोगेश्वरी अंधारात
By Admin | Updated: November 29, 2014 00:30 IST2014-11-29T00:06:32+5:302014-11-29T00:30:36+5:30
वाळूज महानगर : विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाल्याने गेल्या दोन दिवसांपासून अर्धे जोगेश्वरी अंधारात आहे.

दोन दिवसांपासून जोगेश्वरी अंधारात
वाळूज महानगर : विद्युत ट्रान्सफॉर्मर जळाल्याने गेल्या दोन दिवसांपासून अर्धे जोगेश्वरी अंधारात आहे. महावितरणही थकलेल्या वीज बिलामुळे ट्रान्सफॉर्मर बसविण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ट्रान्सफॉर्मर जळाल्याने जोगेश्वरी मूळ गावातील अर्ध्या भागात गेल्या दोन दिवसांपासून वीज नाही. तळई जुने गाव येथील १०० व ६३ होल्टेजचे जळालेले ट्रान्सफॉर्मर महावितरणने दुरुस्तीसाठी जमा केले आहेत; परंतु ते अद्याप बसविण्यात आलेले नाहीत.
या भागातील नागरिकांवर बिलाची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने व नागरिक वीज बिल भरण्यास पुढाकार घेत नसल्याने महावितरणही रोहित्र बसविण्यासाठी टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे या भागात दोन दिवसांपासून अंधार
आहे.
वीज नसल्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक क ोलमडले असून पिठाच्या गिरण्याही बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी व दळणासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. या भागात बहुतांशी कामगार राहत असल्याने रात्रीच्या वेळी कामगार व नागरिकांना अंधारातूनच ये-जा करावी लागत आहे. एकूणच वीज नसल्याने या भागातील रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.