संजय शिरसाटांच्या विरोधात जोडे मोरो आंदोलन; ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा

By बापू सोळुंके | Updated: March 28, 2023 13:06 IST2023-03-28T13:05:51+5:302023-03-28T13:06:16+5:30

ठाकरे गट शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून महिला आघाडी संतप्त.

Jode Moro agitation against Sanjay Shirsata; Aggressive stance of women's front of Thackeray group | संजय शिरसाटांच्या विरोधात जोडे मोरो आंदोलन; ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा

संजय शिरसाटांच्या विरोधात जोडे मोरो आंदोलन; ठाकरे गटाच्या महिला आघाडीचा आक्रमक पवित्रा

छत्रपती संभाजीनगर: आमदार संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्या विषयी केलेल्या विधानाबद्दल महिला आघाडीमध्ये असंतोष पसरला आहे. ठाकरे गट शिवसेना महिला आघाडीच्यावतीने क्रांतीचौकात आमदार संजय शिरसाठ यांच्याविरुद्ध आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास जोरदार निदर्शने करण्यात आली. संजय शिरसाठ यांचे करायचे काय, खाली मुंडकं वर पाय ,मिंधे सरकार हाय, हाय, शिंदे सरकार करायचं काय,खाली मुंडके वर पाय, अशा घोषणा महिला आघाडीच्या वतीने देण्यात आल्या.

शिंदे गट शिवसेनेच्यावतीने रविवारी संत एकनाथ रंग मंदिरात आयोजित मेळाव्यात भाषण करताना आमदार संजय शिरसाठ यांनी ठाकरे गट शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी केलेले विधान ऐकून शिवसेना ठाकरे गटात महिला आघाडी संतप्त झाली. आमदार शिरसाठ यांच्या निषेधार्थ आज क्रांती चौक येथे शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक प्रतिभा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलक महिलांनी आमदार संजय शिरसाठ यांच्या प्रतिमेला जोडे मारो आणि प्रतिमेला शेण खाऊ घालत आंदोलन केले. या आंदोलनात सुकन्या भोसले, मीरा देशपांडे, दुर्गा भाटी आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Web Title: Jode Moro agitation against Sanjay Shirsata; Aggressive stance of women's front of Thackeray group