शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

परीक्षेत तोतयागिरी करून मिळविली बालविकास विभागात नोकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 11:54 PM

संरक्षण अधिकारीपदाच्या लेखी परीक्षेत तोतयागिरी करून महिला व बालविकास विभागात संरक्षण अधिकारीपदावर एक जणाने नोकरी मिळविल्याचे समोर आले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

ठळक मुद्देसिडको पोलीस : महिला व बालविकास विभागात संरक्षण अधिकारीपदावर नियुक्त झालेल्यासह तीन जणांविरोधात गुन्हा, चार वर्षांपूर्वी सिडकोतील विद्यालयात दिली होती परीक्षा

औरंगाबाद : संरक्षण अधिकारीपदाच्या लेखी परीक्षेत तोतयागिरी करून महिला व बालविकास विभागात संरक्षण अधिकारीपदावर एक जणाने नोकरी मिळविल्याचे समोर आले. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.विशाल उत्तम राठोड (संरक्षण अधिकारी कनिष्ठ, ता. किनवट, जि. नांदेड), परीक्षा देणारा सुलतान सालेमिया बारब्बा (रा. नांदगाव, ता. लातूर) आणि मध्यस्थ प्रबोध मधुकर राठोड (रा. मांडवी, ता. किनवट, जि. नांदेड) अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. सिडको ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांनी सांगितले की, नांदेड येथील एका प्रकरणाचा तपास करीत असताना महिला व बालविकास विभागाने संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या पदासाठी ७ सप्टेंबर २०१४ रोजी औरंगाबादेतील धर्मवीर संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केंद्रावर परीक्षा झाली होती. विशाल उत्तम राठोड या उमेदवाराऐवजी आरोपी सुलतान सालेमिया बारब्बा याने लेखी परीक्षा दिली होती. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत विशालचे नाव आले. शासनाने ३ जुलै २०१७ रोजी विशालला महिला व बालविकास विभागात संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) या पदावर नेमणूक दिली. तेव्हापासून विशाल हा शासकीय सेवेत आहे. दरम्यान राज्य गुन्हा अन्वेषण विभागाने एका प्रकरणात केलेल्या तपासात आरोपी विशाल राठोड यानेही स्वत:च्या जागेवर डमी उमेदवार परीक्षेस बसवून नोकरी मिळविल्याचे समोर आले होते. या केसमध्ये आरोपी प्रबोध राठोड याने विशाल आणि सुलतान यांच्यात मध्यस्थाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले होते. याबाबतचा अहवाल सीआयडीने महिला व बालविकास विभागाला कळवून याविषयी निर्णय घेण्याचे सुचविले होते. महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार औरंगाबाद महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त मारोती केरबा शिरसाट यांनी १६ जुलै रोजी सिडको पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे दिला.बनावट हॉल तिकीट तयार केलेपरीक्षेत तोतयागिरी उघड होऊ नये, याकरिता आरोपींनी मोठ्या शिताफीने कट रचून त्याची अंमलबजावणी केल्याचे निष्पन्न झाले. विशाल राठोडच्या प्रवेशपत्रासारखेच दुसरे बनावट प्रवेशपत्र तयार केले. या प्रवेशपत्रावर विशालच्या छायाचित्राच्या जागेवर आरोपी सुलतानचे छायाचित्र चिकटविले. त्यावर सुलतानने विशाल राठोडच्या नावाने परीक्षा दिली. यासोबत अन्य बनावट ओळखपत्रही त्यांनी सोबत नेले होते. 

टॅग्स :Aurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीसCrime Newsगुन्हेगारी