जायकवाडीची आवक घटली
By Admin | Updated: August 10, 2014 02:08 IST2014-08-10T02:00:14+5:302014-08-10T02:08:31+5:30
पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग कमी केल्याने जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक घटण्याची शक्यता आहे.

जायकवाडीची आवक घटली
पैठण : जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू असून, ९०५० क्युसेक्स क्षमतेने पाणी दाखल होत आहे. धरणामध्ये १५.१४ टक्के जलसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिल्याने व नाशिक जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग कमी केल्याने जायकवाडीत येणाऱ्या पाण्याची आवक घटण्याची शक्यता आहे. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणात आज सायंकाळी १५००.९० फूट पाणी पातळी झाली होती. धरणात एकूण जलसाठा १०६६.८२९ द.ल.घ.मी. झाला असून, यापैकी ३२८.७२३ द.ल.घ.मी. उपयुक्त जलसाठा आहे. (वार्ताहर)