शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

पैठणच्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ६० टक्क्यांवर; आणखी आवक सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 3:51 PM

औरंगाबाद, दि. २२ : मराठवाड्यात शनिवारी व रविवारी अशा दोन दिवसात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. यासोबतच पैठणच्या जायकवाडी धरणाच्या ...

ठळक मुद्देसकाळी १० पर्यंत पाणी साठ्याची पातळी ६०.१६ टक्केजवळपास २७ हजार क्युसेकने धरणात पाण्याची आवक २४ तासात जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने आवक घटण्याची शक्यता

औरंगाबाद, दि. २२ : मराठवाड्यात शनिवारी व रविवारी अशा दोन दिवसात सर्वदूर जोरदार पाऊस झाला. यासोबतच पैठणच्या जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे.  पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. 

मंगळवारी सकाळी झालेल्या नोंदीप्रमाणे धरणाची पाणी पातळी ६०.१६ टक्क्यांवर पोहोचली आहे. यासोबतच धरणाच्या वरील प्रदेशातून २६,६६६ क्युसेक या क्षमतेने पाण्याची आवक सुरु आहे. मागील ४८ तासात १० टक्के पाण्याची भर पडल्याने धरण साठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. आवक अशीच राहिली तर धरण पूर्ण क्षमतेने भरू शकते. 

दोन ते अडीच महिन्याच्या खंडानंतर मराठवाड्यात पावसाचे जोरदार आगमन झाले. तसेच धरणाच्या वरील भागातूनही मोठ्याप्रमाणावर पाणीसाठा धरणात येत आहे. सध्या धरणात २६,६६६ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू अस आज सकाळी १० वाजता जलसाठा ६०% पेक्षा पुढे गेला होता. दरम्यान, मंगळवारी नाशिक व नगर जिल्ह्यातील धरण समुहातून होणारा विसर्ग घटविण्यात आला आहे. त्यातच गेल्या २४ तासात जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याने धरणात येणारी आवक घटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.नांदूर मधमेश्वर वेअरमधून गोदावरीत ११ हजार तर ओझर वेअर मधुन प्रवरा नदीत २५०० क्युसेक्स पर्यंत विसर्ग आज घटविण्यात आला आहे. गेल्या २४ तासात स्थानिक पाणलोट क्षेत्रापैकी शिर्डी, राहता, कोतुळ आदी भागात सरासरी ४५ मि.मी पावसाची नोंद झाली असून हे पाणी दुपार पर्यंत धरणात येत राहिल. १५२२ फूट जलक्षमता असलेल्या धरणाची आज सकाळी पाणीपातळी१५१३.८७ फूट ऐवढी झाली होती. धरणात एकूण जलसाठा २०४४.३०२ दलघमी झाला असून या पैकी १३०६.१९६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे.