स्वयश जैस्वालने ठोकल्या १४७ धावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 01:29 IST2019-05-01T01:29:17+5:302019-05-01T01:29:33+5:30
जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर आजपासून सुरू झालेल्या १६ वर्षांखालील दोनदिवसीय कुंटे साखळी क्रिकेट स्पर्धेत स्वयश जैस्वाल याने दणकेबाज शतकी खेळी करीत पहिला दिवस गाजवला

स्वयश जैस्वालने ठोकल्या १४७ धावा
औरंगाबाद : जिल्हा क्रिकेट संघटनेच्या एन-२ स्टेडियमवर आजपासून सुरू झालेल्या १६ वर्षांखालील दोनदिवसीय कुंटे साखळी क्रिकेट स्पर्धेत स्वयश जैस्वाल याने दणकेबाज शतकी खेळी करीत पहिला दिवस गाजवला. स्वयश जैस्वाल याच्या २६ सुरेख चौकारांसह फटकावलेल्या १४७ धावांच्या बळावर काळे डेअरी फॉर्म्स संघाने ४५.४ षटकांत सर्वबाद २०२ धावा फटकावल्या. अद्वैश जोशीने ११ धावा केल्या. वंश ग्रुप संघाकडून तन्मय काबरा आणि प्रत्युश भास्कर यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे २३ व १४ धावा मोजल्या. अक्षद अग्रवालने २० धावांत २ तर वरुण पटेल व पार्थ चव्हाण यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. प्रत्युत्तरात वंश ग्रुपचा पहिला डाव ९८ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून स्वप्नील राठोडने ४ चौकारांह २१, प्रत्युश भास्करने १८ धावांचे योगदान दिले. काळे संघाकडून पवन हाडे, स्वयेश जैस्वाल यांनी प्रत्येकी ३, तर मधुष जोशीने २ व कल्पेश पाटणी व हरीओम काळे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला.