जळगाव रोडवर ट्रकचालकास मारहाण करून लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 21:51 IST2019-06-27T21:51:38+5:302019-06-27T21:51:48+5:30
ट्रकचालकास चौघांनी मारहाण करून लुटल्याचा प्रकार दि.२६ जून रोजी पहाटे जळगावरोडवरील जाधववाडीत एका लॉनजवळ घडला.

जळगाव रोडवर ट्रकचालकास मारहाण करून लुटले
औरंगाबाद : लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रकचालकास चौघांनी मारहाण करून लुटल्याचा प्रकार दि.२६ जून रोजी पहाटे जळगावरोडवरील जाधववाडीत एका लॉनजवळ घडला.
ज्ञानदेव जयसिंग धायगुडे (३५, रा. पिंप्री बुद्रुक, ता. खंडाळा, जि. सातारा), असे ट्रकचालकाचे नाव आहे. ते गाडी थांबवून जळगाव रोडवरील लॉनजवळ लघुशंकेसाठी थांबले होते. त्यावेळी त्यांना चौघांनी जबर मारहाण करीत लुटले. लुटमार करणाऱ्यांनी धायगुडे यांच्याजवळील रोख रक्कम अडीच हजार रुपये, बँकेचे एटीएम कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, आधार कार्ड आदी ऐवज लुटून नेला. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार गोराडे पुढील तपास करीत आहेत.