लोकमत आणि स्टार प्रवाहतर्फे जय देवा श्रीगणेशा महाचित्रकला स्पर्धा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 10:02 IST2020-08-20T04:53:45+5:302020-08-20T10:02:54+5:30
तुमच्यातील चित्रकाराला वाव देण्यासाठी स्टार प्रवाह आणि लोकमत यांच्याकडून जय देवा श्री गणेशा महाचित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहे.

लोकमत आणि स्टार प्रवाहतर्फे जय देवा श्रीगणेशा महाचित्रकला स्पर्धा
औरंगाबाद : यावर्षी गणेशोत्सवात लोकमत आणि स्टार प्रवाह यांच्या वतीने जय देवा श्री गणेशा महाचित्रकला स्पर्धा घेण्यात येणार आहेत. बाल मित्रांनो, आपल्या प्रत्येकामध्येच एक चित्रकार दडलेला असतो. त्यामुळेच तुमच्यातील चित्रकाराला वाव देण्यासाठी स्टार प्रवाह आणि लोकमत यांच्याकडून जय देवा श्री गणेशा महाचित्रकला स्पर्धा घेण्यात येत आहे.
>चित्रकला आणि मूर्ती कार्यशाळेला प्रतिसाद
लोकमत पाठशाला आणि स्टार प्रवाह यांच्या वतीने दि. १४ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या लाईव्ह कार्यशाळांना अवघ्या महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये कलाकार शरद कोकाटे यांनी मूर्ती बनविण्याचे, तर चित्रकार जितेंद्र डहाके यांनी चित्रकलेचे मार्गदर्शन केले. सुप्रसिद्ध अभिनेता राकेश बापट आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी यांची या कार्यक्रमातील विशेष भेटही रसिकांचा उत्साह वाढविणारी ठरली. स्पृहाने बहारदार कविता सादर केल्या. राकेश व स्पृहा यांनी रसिकांशी भरपूर गप्पाही मारल्या.
>जय देवा श्री गणेशा महाचित्रकला स्पर्धा
100 विजेती चित्रे स्टार प्रवाह वरील जय देवा श्री गणेशा या कार्यक्रमात दाखवली जातील. भरपूर बक्षिसे जिंका. सर्व सहभागी होणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. सुवर्ण संधी
बाल विकास मंच आणि कॅम्पस क्लबच्या विद्यार्थी
मित्रांसाठीसुद्धा सुवर्ण संधी.
विशेष
बक्षिसे
>आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं एक छान चित्र काढून आम्हाला +91 81084 69407 या क्रमांकावर व्हॉटस्अॅप करा. चित्र स्केच स्वरूपात, रंगवून किंवा इतर कोणत्याही प्रकारे काढून पाठवू शकता. कृपया आम्हाला मुला/मुलींची नावे, शाळेचे नाव, इयत्ता, शहराचे नाव आणि संपर्क क्रमांक सोबत पाठवा.