शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगळुरूला धक्का, अहमदाबादमध्ये खेळवली जाणार IPL 2026 ची फायनल, प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
2
पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात...
3
सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार 'पावसात वाहून गेला'; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य
4
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
5
"नुसतं नावाला 'घरचं मैदान', पिच बनवताना आम्हाला विचारत नाहीत.."; DC च्या कोचचा राग अनावर
6
इराकची जगाला मोठी 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच...
7
Top Marathi News LIVE: प. बंगालमध्ये निकालानंतर हिंसाचार थांबेना, जमावाने लेनिनचा पुतळा तोडला...
8
नशीब असावं तर थलापती विजयसारखं...! आधी TVK चा मोठा विजय अन् आता समोरून आली Good News
9
तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट; AIADMK चा TVK ला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय!
10
Punjab Blast: पंजाब हादरलं! ३ तासांत २ मोठे धमाके; अमृतसर आणि जालंधरमध्ये नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण टाइमलाईन
11
एका फुग्यावरून वाद अन् तरुणाचा बळी! उत्तम नगर मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासे
12
लोन फेडलं नाही तर बँक जप्त करू शकते तुमची प्रॉपर्टी; RBI नं जारी केले नवे ड्राफ्ट नियम
13
पश्चिम बंगालचा निकाल येताच अखिलेश यादव यांचा मोठा निर्णय; समाजवादी पार्टीने IPAC सोबतची डील केली रद्द
14
DC vs CSK : वाऱ्यानं बेल्स पडल्या, मग Nitish Rana आउट कसा? डेड बॉल का नाही? नियम काय सांगतो?
15
दिवाळखोर होण्याचं संकट टळलं! कंपनीला क्लिन चीट, शेअरला २०%चं अपर सर्किट; ३० दिवसांत ३३% ची वाढ
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' ४ मुलांकांच्या स्त्रिया साक्षात लक्ष्मीचं रूप; घरात आणतात अपार सुख-समृद्धी
17
विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा द्या, अन्यथा..., ३० आमदारांचा इशारा, तामिळनाडूत अण्णा द्रमुक फुटीच्या उंबरठ्यावर?
18
मुंबई विमानतळावर ७ मे रोजी ६ तासांचा 'ब्लॉक'; धावपट्टीच्या देखभालीसाठी विमान सेवा राहणार बंद
19
Sanju Samson: संजू सॅमसन सुसाट! डेव्हिड वॉर्नरचा रेकॉर्ड मोडला, एबी डिव्हिलियर्सचा विक्रम धोक्यात
20
अजबच! एकाच आईच्या जुळ्या मुली, पण दोघींचेही वडील वेगवेगळे; DNA रिपोर्टमधून खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लढतींचे चित्र होणार स्पष्ट !

By admin | Updated: October 1, 2014 00:46 IST

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. छाननीअंती ३५ उमेदवारी अर्ज बाद झाले होते. तर १०८ नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते.

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. छाननीअंती ३५ उमेदवारी अर्ज बाद झाले होते. तर १०८ नामनिर्देशनपत्र वैध ठरले होते. मंगळवारी तुळजापूर मतदार संघातील २ तर उस्मानाबाद मतदार संघातील तिघांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. १ आॅक्टोबर ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने यानंतर चारही मतदार संघातील प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे चारही पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. तसेच अपक्षांची संख्याही भरमसाठ आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख १ आॅक्टोबर इतकी आहे. मंगळवार अखेर तुळजापूर आणि उस्मानाबाद या विधानसभा मतदार संघातून अनुक्रमे दोन आणि तीन अशा पाच जणांनी माघार घेतली आहे. यामध्ये तुळजापूर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सुचीता जीवनराव गोरे आणि अतुल नागनाथ जवान या उमेदवारांनी माघार घेतली आहे. तसेच उस्मानाबाद मतदार संघातील भीमाशंकर जाधव, केरबा विठ्ठल गाढवे आणि शिवाजी कापसे यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली आहे. त्यामुळे आणखी १०३ उमेदवार रिंगणात आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठी आणखी एक दिवसाचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे बुधवारी चारही मतदार संघातील प्रमुख लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.उमरग्यात बंड नाहीउमरगा विधानसभा मतदारसंघातून गुंजोटी येथील शिवसेनेच्या विलास व्हटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी ते आग्रही होते. मात्र एबी फॉर्म विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांना गेल्याने व्हटकर यांचा अर्ज सोमवारी बाद ठरला होता. अशीच स्थिती इतर काही उमेदवारांचीही आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सतीश सरवदे यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी प्रा. विजय क्षीरसागर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एबी फॉर्म देवून त्यांना अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यामुळे सरवदे यांचाही अर्ज एबी फॉर्मअभावी बाद ठरला. त्यामुळे उमरगा मतदारसंघात बंडाचे निशान फडकण्याची शक्यता उरलेली नाही. (वार्ताहर)काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढण्याचे जाहीर केल्यानंतर तुळजापूर मतदार संघातून उमेदवारीसाठी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचे नाव आघाडीवर होते. निवडणूकीच्या अनुषंगाने धुरगूडे यांनी जोरदार मोर्चेबांधणीही केली होती. ऐनवेळी पक्षाने महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांना निवडणूक रिंगणामध्ये उतरविले. त्यामुळे नाराज झालेल्या धुरगुडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. धुरगुडे माघार घेतील असे, सुरूवातील बोलले जात होते. परंतु, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी एक दिवस शिल्लक राहिलेला असतानाही त्यांनी उमेदवारी मागे घेतलेली नाही. विशेष म्हणजे त्यांनी उमेदवारी मागे घेवू नये असा आग्रह त्यांच्या समर्थकांचा आहे. दूसरीकडे राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी सुरू आहे. जीवनराव गोरे यांनीही मंगळवारी त्यांच्या घरी जावून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांनी उमेदवारी मागे घेण्यासंदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता. त्यामुळे धुरगुडेंची मनधरणी करण्यात पक्ष श्रेष्ठी यशस्वी होते की नाही, हे बुधवारीच स्पष्ट होेणार आहे.