भाजपनेच 'बीआरएस'ला महाराष्ट्रात उतरवलं; संजय राऊतांचा सनसनाटी आरोप

By बापू सोळुंके | Published: June 8, 2023 07:14 PM2023-06-08T19:14:05+5:302023-06-08T19:14:28+5:30

''कर्नाटकात मोदी, शहा यांनी रोड शो केले, त्यांना कोण अडवतोय मात्र जे कर्नाटकात झाले तेच महाराष्ट्रात होईल''

It was BJP that brought 'BRS' to Maharashtra; Sanjay Raut's sensational accusation | भाजपनेच 'बीआरएस'ला महाराष्ट्रात उतरवलं; संजय राऊतांचा सनसनाटी आरोप

भाजपनेच 'बीआरएस'ला महाराष्ट्रात उतरवलं; संजय राऊतांचा सनसनाटी आरोप

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: भारतीय जनता पक्षानेच भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाला महाराष्ट्रात आणले आहे, असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. भाजपने मनसेचा वापर केला, शिंदे गटाचा करीत आहे आणि तसाचा वापर करण्यासाठी त्यांनी केसीआर यांना महाराष्ट्रात आणल्याचे चित्र दिसत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

शिवसेना शाखा स्थापनेच्या ३९ वा वर्धापनदिनानिमित्त आयोजित पक्षाच्या मेळाव्यासाठी खा. राऊत छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आहेत. बुधवारी सकाळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, पाच राज्यात निवडणुका होत आहे, भाजप एक राज्य जिंकणार नाही. केंद्रीय गृहराज्यमंत्री अमित शहा मुंबईत येतात, महाराष्ट्रात येऊ द्या, त्यांचा पराभव अटळ आहे. कर्नाटकात मोदी, शहा यांनी रोड शो केले, त्यांना कोण अडवतोय मात्र जे कर्नाटकात झाले तेच महाराष्ट्रात होईल, असा दावाही त्यांनी केला. भाजपने आता बीआरएसला महाराष्ट्रात उतरवल्याचे चित्र दिसत ाहे. भाजपने मनसेचा वापर केला, आता शिंदे गटाचा करीत आहेत. तोडाफोडीवर भाजपचे लक्ष असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा परिस्थितीत आपली लढाई कोणासेाबत आहे, हे केसीआर ने ठरवावं.

फडणवीस सर्वात कमोजर गृहमंत्री
राज्य सरकारवर टांगती तलवार असतानाही सत्तेवर बसलेले आहात. हे सरकार तीन महिन्यात जाणार आहे. राजकारणासाठी तुम्हाला औरंगजेब लागतो. तुम्ही दंगली घडवतात.  देवेंद्र फडणवीस यांचे गृहखाते फेल आहे. गुंडांच्या मुसक्या आवळण्याऐवजी विरोधकांना त्रास देण्यासाठी गृहखात्याचा वापर केला जात आहे.  कमजोर गृहमंत्री म्हणून इतिहासात त्यांची नोंद राहिल अशी टीका राऊत यांनी केली.

Web Title: It was BJP that brought 'BRS' to Maharashtra; Sanjay Raut's sensational accusation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.