बोंडअळी नव्हे, ही तर भाजपा अळी - सत्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 04:54 IST2017-12-02T04:54:28+5:302017-12-02T04:54:54+5:30
औरंगाबाद : कापसाच्या कै-यांना पोखरणारी बोंडअळी भाजपाच्या स्वभावाची आहे. वरून दिसायची नाही, आतून मात्र पोखरून नुकसान करायचे. या अळीचा ...

बोंडअळी नव्हे, ही तर भाजपा अळी - सत्तार
औरंगाबाद : कापसाच्या कै-यांना पोखरणारी बोंडअळी भाजपाच्या स्वभावाची आहे. वरून दिसायची नाही, आतून मात्र पोखरून नुकसान करायचे. या अळीचा रंगही कमळाच्या रंगासारखा गुलाबी आहे. म्हणून ही बोंडअळी नव्हे, तर ‘भाजपा अळी’ असून, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकºयांचे मोठे नुकसान होत आहे, अशी टीका जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकºयांना हेक्टरी ५० हजार रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
कृषिमंत्री दाखवा २५ हजार मिळवा
राज्यात शेतकºयांचे अनेक प्रश्न गंभीर होत असताना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर बेपत्ता आहेत. ते मंत्रालयात बसत नाहीत. मंत्रिमंडळाच्या बैठकांनाही सतत दांडी मारतात. ते केवळ खामगावचे कृषिमंत्री आहेत. शेतकºयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांची नेमकी भूमिका काय? ‘कृषिमंत्री दाखवा... आणि काँग्रेसतर्फे २५ हजार रु. मिळवा’, अशी घोषणाच सत्तार यांनी केली.