शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत मराठवाड्यात पाण्याचा मुद्दा तापणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 13:33 IST

मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्प बंधाऱ्यात फक्त ४.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे.  

ठळक मुद्दे४.२५ टक्केच पाणीसाठा मराठवाड्यात उपलब्ध२००० च्या जवळपास टँकरचा आकडा पोहोचला

औरंगाबाद : मराठवाड्याला यंदाचा उन्हाळा अतिशय भयावह जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. एकीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण तयार होत असताना विभागातील बहुतांश जलप्रकल्प तळाला गेले असून, काही प्रकल्प आटले आहेत. त्यामुळे भर निवडणुकीत पाण्याचा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत. मोठ्या, मध्यम, लघु प्रकल्प बंधाऱ्यात फक्त ४.२५ टक्के इतका पाणीसाठा आहे.  

विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत ३.९० टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांत ५ टक्के तर ७४९ लघु प्रकल्पांत ५ टक्के पाणीसाठा आहे. १३ बंधाऱ्यांत १० टक्के तर उर्वरित इतर २४ बंधारे आटले आहेत. नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी विभागीय प्रशासन नियोजन करण्याचे प्रयत्न करीत आहे. विभागात सर्वाधिक पिण्याच्या पाण्याची टंचाई औरंगाबाद जिल्ह्यात आहे. १३ लाख नागरिकांना पिण्याचे पाणी टँकरने पुरविले जात आहे. २०८६ हून अधिक विहिरी प्रशासनाने ताब्यात (अधिग्रहित) घेतल्या आहेत. बीड जिल्ह्यात ७ लाख नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. ७०० विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. त्यानंतर जालना जिल्ह्यातील ५ लाख नागरिकांना टँकरचे पाणी दिले जात आहे. ४०० विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. 

३० लाख नागरिकांची तहान टँकरवरकधी नव्हे एवढे टँकर मार्च महिन्याच्या सुरुवातीला विभागात सुरू असून, १८४६ टँकरने आठ जिल्ह्यांतील सुमारे ३० लाख नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो आहे. येणाऱ्या आठ दिवसांत २ हजारांच्या आसपास टँकरचा आकडा जाईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला. १ हजार ३६८ गावांत, ४८१ वाड्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई सध्या आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९droughtदुष्काळWaterपाणीMarathwadaमराठवाडा