इस्कॉनची खिचडी ग्रामीण भागात?
By Admin | Updated: September 10, 2014 00:50 IST2014-09-10T00:40:38+5:302014-09-10T00:50:54+5:30
औरंगाबाद : इस्कॉनतर्फे शहरातील शाळांना पुरविण्यात येणाऱ्या खिचडीचा दर्जा पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही इस्कॉनची खिचडी माध्यान्ह भोजनात मिळावी, यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

इस्कॉनची खिचडी ग्रामीण भागात?
औरंगाबाद : इस्कॉनतर्फे शहरातील शाळांना पुरविण्यात येणाऱ्या खिचडीचा दर्जा पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही इस्कॉनची खिचडी माध्यान्ह भोजनात मिळावी, यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी यात विशेष रुची दाखविली असून, त्यांच्या कक्षात मंगळवारी यासंदर्भात बैठकही बोलावण्यात आली होती. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांच्यासह प्रभारी शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांची उपस्थिती होती. ग्रामीण भागात प्रायोगिक तत्त्वावर खुलताबाद व फुलंब्री तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी इस्कॉनची खिचडी उपलब्ध करून देता येईल का, या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी खुलताबाद तालुक्यात मध्यवर्ती स्वयंपाकगृह बांधण्यासंदर्भात आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.