शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

छ. संभाजीनगरातील आकाशवाणी चौक खुला करण्याचा डाव निवडणुकीपुरताच? आता मागवल्या हरकती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:17 IST

९ जानेवारी रोजी पोलिसांनी बॅरिकेट्स काढून चौक खुला केला. चौकात कार्यकर्त्यांच्या जल्लोषात पालकमंत्री सहभागी झाले.

छत्रपती संभाजीनगर : ऐन महानगरपालिका निवडणुकीदरम्यान पोलिसांनी अचानक बॅरिकेट काढून आकाशवाणी चौक वाहतुकीसाठी खुला केला. या निर्णयाला राजकीय दबावाची किनार होती. निवडणूक आयोगाने याची दखल घेत खुलासा मागवला होता. आता पुन्हा पोलिसांनी सदर चौक बंद करण्याची हालचाल सुरू केली असून, जाहीर प्रगटनाद्वारे त्याबाबत रीतसर आक्षेप, हरकती, सूचना मागवल्या आहेत.

जालना रोडवरील वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. २०१६ मध्ये सकाळी व सायंकाळी प्रत्येकी तीन तासांसाठी आकाशवाणी व अमरप्रीत चौक बंद करून वाहतूक सरळ सुरू ठेवण्याचा प्रयोग राबवला होता. त्यानंतर दोन्ही चौक सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ऐन मनपा निवडणुकीत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिस आयुक्तांना चौक खुला करण्याबाबत पत्र पाठवले. ९ जानेवारी रोजी पोलिसांनी बॅरिकेट्स काढून चौक खुला केला. चौकात कार्यकर्त्यांच्या जल्लोषात पालकमंत्री सहभागी झाले. विरोधकांनी जल्लोष करत श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. चौक खुला करण्याचे कुठलेही अधिकृत नोटिफिकेशन न काढल्याने निवडणूक आयोगाने याबाबत खुलासा मागवला होता. २१ जानेवारी रोजीच्या पोलिसांच्या जाहीर प्रगटनात मात्र निवडणुकीत राजकीय नेते, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वेळ वाचवण्यासाठी तत्काळ युटर्न घेता यावा, यासाठी चौक खुला केल्याचे नमूद केले आहे.

सात दिवसांचा कालावधीसहायक पोलिस आयुक्त सुभाष भुजंग यांनी जारी केलेल्या प्रगटनात चौक भविष्यात खुला ठेवावा की रोज सकाळी ९ ते रात्री ९ वाजेदरम्यान बॅरिकेट्स लावून बंद करावा, याबाबत सात दिवसांच्या आत मोंढा नाका येथील निशा प्राईड इमारतीमधील सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) कार्यालयात लेखी स्वरूपात तसेच acptraff.abad@mahapolice.gov.in या ई-मेलवर आक्षेप, हरकती, सूचना मागवण्यात आल्या आहेत. हे दाखल करणाऱ्यांना पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांक नोंदवणे बंधनकारक असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Aurangabad's Akashwani Chowk: Election Gimmick? Objections Invited Again.

Web Summary : Akashwani Chowk, opened pre-election, faces closure again. Police seek objections regarding its operational hours, raising doubts about the initial decision's motives and permanence.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस