शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

दमदार पावसाचा सिंचनाला फायदा; रबी, खरीप हंगामासाठी १४३८ दलघमी पाणी सोडण्यात येणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 7:06 PM

कालवा सल्लागार समितीची २०२०-२१ ची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झाली.

ठळक मुद्देप्रथम पाणीपाळी राबविण्याच्या दृष्टीने १४३८ दशलक्ष घनमीटर पाणी टप्प्याने सोडण्यात येणारजायकवाडी प्रकल्पाचे दोन्ही कालव्यावरील लाभक्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी व अहमदनगर जिल्ह्यात आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा १५० टक्के  पाऊस झाला. परिणामी विभागातील सर्व धरणे शंभर टक्के भरली असून, त्याचा फायदा सिंचनाला होणार आहे. आगामी रबी आणि खरीप हंगामात विभागातील जायकवाडी, निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर कालवा या मोठे प्रकल्पावरील सिंचन पाणी नियोजनासाठी प्रथम पाणीपाळी राबविण्याच्या दृष्टीने १४३८ दशलक्ष घनमीटर पाणी टप्प्याने सोडण्यात येणार आहे. 

कालवा सल्लागार समितीची २०२०-२१ ची बैठक समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन झाली. धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करून प्राधान्याने पिण्यासाठी आणि सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना अध्यक्ष चव्हाण यांनी दिल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी जायकवाडी, निम्न दुधना, नांदूर मधमेश्वर कालवा या मोठ्या प्रकल्पावरील रबी प्रथम आवर्तनासाठी मान्यता दिली. बैठकीत प्रकल्पावरील उपलब्ध पाण्याचे रबी व उन्हाळी हंगामाच्या नियोजनाबाबत अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे यांनी सादरीकरण केले. 

नांदूर मधमेश्वरमधून पाणी देणारनांदूर मधमेश्वर प्रकल्पावरील लाभक्षेत्र हे औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यात आहे. नाशिक जिल्ह्यात मुकणे, भाम, भावली व वाकी धरणांत १०० टक्के पाणीसाठा आहे. बाष्पीभवन, घरगुती व औद्योगिक पाणीवापर, धरणाखालील बंधाऱ्यात पाणी सोडल्यानंतर उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रबी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे २ आवर्तन देणे प्रस्तावित आहे. 

­जायकवाडी प्रकल्पातील नियोजन असे...जायकवाडी प्रकल्पाचे दोन्ही कालव्यावरील लाभक्षेत्र औरंगाबाद, जालना, परभणी व अहमदनगर जिल्ह्यात आहे.  १ लाख २० हजार हेक्टर सिंचन क्षेत्रासाठी १७० दलघमी पाणी देण्यास मान्यता दिली आहे. दोन्ही कालव्यावर १ लाख ४६ हजार ९०० हेक्टर व ५३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित करणे नियोजित आहे. त्यासाठी ११४८ दलघमी पाणीवापर अपेक्षित आहे.लोअर दुधनातूनही पाणी        लोअर दुधना धरणात १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. बाष्पीभवन होऊन उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रबी व उन्हाळी हंगामात अनुक्रमे प्रत्येकी ३ पाणी आवर्तन देणे प्रस्तावित आहे. यात १५ हजार १००  व ५ हजार ९२० हेक्टर क्षेत्र सिंचित करणे नियोजित असून त्यात १५२ दलघमी पाणीवापर होईल. 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पMarathwadaमराठवाडाJayakwadi Damजायकवाडी धरण