बाजारसावंगी शिवारातील सिंचन योजनेची तपासणी सुरू

By | Updated: December 4, 2020 04:14 IST2020-12-04T04:14:13+5:302020-12-04T04:14:13+5:30

बाजारसावंगी : पोकरा योजनेंतर्गत विविध लाभाच्या योजनांचा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घेणे सुरू केलेले असून, लाभ घेतलेल्यांची तपासणी करण्यात ...

Investigation of irrigation scheme in Bazarsawangi Shivara started | बाजारसावंगी शिवारातील सिंचन योजनेची तपासणी सुरू

बाजारसावंगी शिवारातील सिंचन योजनेची तपासणी सुरू

बाजारसावंगी : पोकरा योजनेंतर्गत विविध लाभाच्या योजनांचा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घेणे सुरू केलेले असून, लाभ घेतलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे. या योजनेतील ठिंबक व तुषार योजनेकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कल वाढला आहे. त्यामुळे येत्या काळात ठिबक सिंचन योजनेत मोठ्या संख्येने वाढ होणार हे निश्चित झाले आहे. बाजारसावंगी येथील ६५, ताजनापूर ४२, शेखपूरवाडी १५, कनकशिळ ५७, रेल १४, सोबलगाव २२, पाडळी १२१, दरेगाव ४० अशा ३७५ लाभार्थींनी ठिबकचा लाभ घेतला आहे. लाभ घेतलेल्या लाभार्थींची मंडळ अधिकारी अशोक बिनगे, कृषी पर्यवेक्षक पंडितराव खंडागळे, कृषी सहायक दीपक हिंगे, श्रीकृष्ण नागरे, सौरभ पाटील, अरविंद पवार, सुराशे यांच्या वतीने तपासणी करण्यात येत आहे.

फोटो - पोकरा योजनेत लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांच्या ठिंबक सिंचन योजनेची पाहणी करताना मंडळ अधिकारी.

Web Title: Investigation of irrigation scheme in Bazarsawangi Shivara started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.