शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची चौकशी करा

By admin | Updated: December 13, 2014 00:29 IST

औरंगाबाद : कथित गैरव्यवहारप्रकरणी दोषींना पाठीशी घातल्याप्रकरणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधितांची चौकशी करावी, असे आदेश खंडपीठाने शासनाला दिले आहेत.

औरंगाबाद : संत ज्ञानेश्वर महाराजांची जन्मभूमी असलेल्या आपेगाव (ता. पैठण) येथील विविध विकास योजनांची अंमलबजावणी करताना झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी दोषींना पाठीशी घातल्याप्रकरणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधितांची चौकशी करावी, असे आदेश खंडपीठाने शासनाला दिले आहेत.पैठण तालुक्यातील आपेगाव येथील ग्रामपंचायतीमार्फत यशवंत ग्रामसमृद्धी योजनेसह अन्य योजना राबविण्यात आल्या. या योजनांची अंमलबजावणी करताना झालेल्या कथित अपहाराची चौकशी करावी, अशी याचिका अण्णासाहेब औटे यांनी अ‍ॅड. प्रदीप देशमुख यांच्यामार्फत न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका न्यायमूर्ती बी.पी.धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती ए.एम. बदर यांच्यासमोर सुनावणीसाठी आली असता याचिकाकर्त्यातर्फे युक्तिवाद करण्यात आला की, हा गैरव्यवहार झाला तेव्हा कैलास औटे हे ग्रामपंचायतीचे सरपंच होते. ते सध्या पंचायत समिती सदस्य आहेत. त्यांच्यामुळे या प्रकरणाची योग्य चौकशी होत नाही. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाची चौकशी केल्याचे शपथपत्र न्यायालयात दाखल केले; मात्र हा चौकशीचा फार्स आहे. गटविकास अधिकारी आणि अन्य दोषींवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न मुख्य कार्यकारी अधिकारी करीत असल्याचे सांगण्यात आले. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यात तथ्य असल्याचे नमूद करीत वरीलप्रमाणे निर्देश दिले. या याचिकेत अ‍ॅड. देशमुख यांना अ‍ॅड. सचिन जोशी, अ‍ॅड. यशोदीप देशमुख आणि अ‍ॅड. योगेश देशमुख यांनी साहाय्य केले.