शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

भाजपमध्ये बंडखोरी; रमेश पोकळे, प्रवीण घुगेंनी भरला पदवीधरसाठी उमेदवारी अर्ज

By सुमेध उघडे | Updated: November 11, 2020 17:03 IST

विशेष म्हणजे दोघेही भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जातात. 

ठळक मुद्देपक्षाने सांगितले म्हणून उमेदवारी दाखल केल्याचे प्रवीण घुगे म्हणालेपक्षाचा दुसऱ्या पसंतीचा उमदेवार म्हणून संधी असल्याचे रमेश पोकळे म्हणाले

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी भारतीय जनात पक्षाने शिरीष बोराळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र बोराळकर यांना तिकीट भेटल्याने भाजपात बंडखोरीची सुरुवात झाली आहे. भाजपाचे बीड जिल्हा माजी अध्यक्ष रमेश पोकळे आणि तिकिटासाठी स्पर्धेत असलेले प्रवीण घुगे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने बोराळकर यांची डोकेदुखी वाढली आहे. विशेष म्हणजे दोघेही भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जातात. 

शिरीष बोराळकर हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असल्याने पदवीधरसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे. उमेदवारीवरून पक्षात मतांतरे आहेत याची कबुलीच प्रदेक्षाध्यक्ष पाटील यांनी यानंतर एका पत्रकार परिषदेत दिली होती. बोराळकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्याने भाजपत अंतगर्त नाराजी वाढून या निवडणुकीत बंडखोरीचा सामना करावा लागणार हे स्पष्ट झाले होते. बुधवारी भाजप बीड जिल्हा माजी अध्यक्ष रमेश पोकळे आणि प्रवीण घुगे या दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे दोघेही पंकजा मुंडे यांचे समर्थक मानले जात असून त्यांनी उमेदवारीसाठी दावा सुद्धा केला होता. 

पक्षाने सांगितले म्हणून...सुरुवातीपासूनच भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न करणारे प्रवीण घुगे यांनी बंडखोरी करून उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी घुगे यांनी पक्षाने सांगितले म्हणून उमेदवारी दाखल केली असे स्पष्ट केल्याने उमेदवारीचा तिढा आणखी वाढला आहे. तर दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांची प्रतिमा हातात घेऊन रमेश पोकळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या निवडणुकीत पसंतीनुसार मतदान असते. दुसऱ्या पसंतीची उमदेवार म्हणून मला संधी आहे असा दावा पोकळे यांनी यावेळी केला. पक्षाच्या अधिकृत उमेदवारा विरोधातली बंडखोरी निवडणुकीत रंगत आणणारी ठरणार आहे. 

टॅग्स :BJPभाजपाPankaja Mundeपंकजा मुंडेAurangabadऔरंगाबादMarathwadaमराठवाडा