शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शाळांच्या आवारात कॅमेरे बसविण्याच्या सूचना!

By admin | Updated: December 6, 2014 00:17 IST

औरंगाबाद : रिक्षाचालकांनीच शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याचे धक्कादायक प्रकरण चव्हाट्यावर आल्यामुळे आता शाळकरी मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे,

औरंगाबाद : रिक्षाचालकांनीच शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याचे धक्कादायक प्रकरण चव्हाट्यावर आल्यामुळे आता शाळकरी मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, अशा घटना रोखण्यासाठी शाळांनी आपल्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षा व बसचालकाची संपूर्ण माहिती स्वत:कडे तर ठेवावीच ती संबंधित पोलीस ठाण्यातही द्यावी, असे पोलीस आयुक्तालयाने सर्वच शाळांना दिल्याचे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले.शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शहरातील एका रिक्षाचालक व त्याचा व्हॅनचालक साथीदाराने शाळेच्या आवारातच काही शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तीन दिवसांपूर्वी उघडकीस आला. या दोन्ही नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे, अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सर्व पोलीस ठाण्यांना आपापल्या हद्दीतील सर्वच शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलविण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त वसंत परदेशी यांनी सांगितले. या बैठकीत अशा घटना रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत मुख्याध्यापकांना सूचना देण्यात येत आहेत. आतापर्यंत अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठका घेण्यात आल्याचेही उपायुक्तांनी सांगितले. त्याचबरोबर नुकतीच घडलेली घटना शाळेच्या आवारातच घडलेली आहे. त्यामुळे सर्व शाळांनी आपापल्या शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.