शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

संस्थाचालकाचा प्रताप; बनावट कागदपत्रांच्या आधारे उचलले ४ कोटी ९४ लाखांचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 18:52 IST

संस्थाचालक मजहर खान, अस्मा खानचा प्रताप : सिटीचौक ठाण्यात गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर : खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेचा वादग्रस्त अध्यक्ष मजहर खान आणि सचिव अस्मा मजहर खानच्या विरोधात बनावट कागदपत्रांच्या आधारे धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी न घेताच संस्थेची मालमत्ता गहाण ठेऊन ४ कोटी ९४ लाख २० हजार ३९९ रुपयांचे कर्ज घेतले. हे कर्ज संस्थेच्या बँक खात्यातून स्वत:च्या खात्यात वळती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोघांसह इतरांच्या विरोधात सिटी चौक ठाण्यात बुधवारी गुन्हा नोंदविला आहे.

सिटीचौक ठाण्यात झेबा इद्रीस खान यांच्या तक्रारीनुसार कोहिनूर शिक्षण संस्थेची स्थापना त्यांचे वडील इद्रीस खान यांनी १९९२ साली केलेली असून, संस्थेतर्फे दोन महाविद्यालये चालविण्यात येतात. फिर्यादीसह त्यांचे पती मोहसीन अन्वर खान हे अजीव सभासद आहेत. या संस्थेच्या मालमत्तेवर बनावट कागदपत्रांच्या आधारे ४ कोटी ९४ लाख २० हजार ३९९ रुपये कर्ज मंजूर करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी वापरल्याची तक्रार २४ नोव्हेंबर २०२५ रोजी पोलिस आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीच्या चौकशीमध्ये मजहर खान व अस्मा खान यानी चोला मंडलम इनव्हेस्टमेंटकडून मौजे बादलाबाई गट नंबर २१ मधील ५५ आर जमीन गहाण खत ठेऊन २ कोटी ९४ लाख २० हजार ३९९ रुपये आणि प्रोफेक्ट्स कॅपिटल प्रा.लि. कंपनीकडे मौजे बादलाबाई गट नंबर २० मधील १ हेक्टर ३५ आर व मौजे नांद्राबाद गट नंबर-३९ मधील १ हेक्टर २१ आर एवढी मालमत्ता गहाण खत करून देत २ कोटी रुपयांचे कर्ज उचलले. त्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयाचा बनावट सही, शिक्यांचा वापर केला. दोन्ही संस्थांकडून कर्ज घेण्यासाठीही धर्मदाय कार्यालयाची मंजुरी घेतली नाही. त्याशिवाय घेतलेले कर्ज संस्थेच्या बँक खात्यातून स्वत:च्या खात्यात वर्ग केले. यात संस्थेसह धर्मादाय कार्यालयाचीही फसवणूक केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी पवार करीत आहेत.

मजहर खानच्या विरोधात १२ गुन्हेसंस्थाचालक मजहर खान यांच्या विरोधात या गुन्ह्यासह आतापर्यंत विविध ठिकाणी १२ गुन्हे दाखल आहेत. त्यात सर्वाधिक फसवणुकीचे गुन्हे आहेत. बनावट पदव्यांच्या प्रकरणात कर्नाटकातील बंगळुरू, उत्तर प्रदेशातील जौनपूर, शहरातील बेगमपुरा ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या सगळ्या प्रकरणात मजहरला अटक केलेली आहे. त्याशिवाय एमआयडीसी सिडको, खुलताबाद, सिटीचौक, हर्सुल, क्रांती चौक ठाण्यातही गुन्हा नोंद आहे.

सध्या जौनपुरच्या कारागृहात मुक्कामजौनपूर येथील एका महाविद्यालयाची बनावट पदवी तयार करून बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्यत्व मिळविले होते. या प्रकरणात सर्वोच्च न्यायलयाने जामीन फेटाळल्यानंतर मजहर खानने आत्मसमर्पण केले आहे. त्यानुसार सध्या मजहर खानचा मुक्काम हा जौनपूर येथील कार्यालयात असल्याची माहिती संबंधितांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Trustee's Fraud: ₹4.94 Crore Loan Secured with Fake Documents

Web Summary : A Kohinoor education society official in Chhatrapati Sambhajinagar is accused of fraudulently obtaining ₹4.94 crore using forged documents and diverting the funds for personal gain. Police have registered a case against the trustee, who already faces 12 other criminal charges, including fraud.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर