शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

मोबाईल मराठी उपक्रम राबविण्याबाबत संस्था अनुत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 7:35 PM

राठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मोबाईल व संगणकावर मराठीचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्याबाबत शासन जरी आग्रही असले तरी अनेक शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालये याविषयी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्दे२०१३ पासून कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन (२७ फेब्रुवारी) मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्त सर्व मंत्रालयीन विभाग व त्या अंतर्गत येणार्‍या सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम घेणे बंधनकारक असते.

औरंगाबाद : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मोबाईल व संगणकावर मराठीचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविण्याबाबत शासन जरी आग्रही असले तरी अनेक शैक्षणिक संस्था व शासकीय कार्यालये याविषयी फारसे उत्सुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे व्याख्यान, निबंध लेखन स्पर्धा यासारख्या पारंपरिक व ‘सोयीचे’ कार्यक्रम आयोजित करून संस्थांनी कर्तव्यपूर्तीचे समाधान मिळविले.

२०१३ पासून कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन (२७ फेब्रुवारी) मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्या निमित्त सर्व मंत्रालयीन विभाग व त्या अंतर्गत येणार्‍या सर्व कार्यालयांमध्ये मराठी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी विविध कार्यक्रम घेणे बंधनकारक असते. बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत अशी भूमिका घेऊन शासनाने यंदा मराठीच्या तांत्रिक विकासात्मक उपक्रमांवर भर देण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने बोलू तसे टंकलेखन (स्पीच-टू-टेक्स्ट) करणार्‍या लिपिकावर व स्वरचक्र अशा अ‍ॅप्सद्वारे मोबाईलवर मराठी टंकलेखन करणे व संगणकावर युनिकोड मराठी कार्यान्वित क रणे, अशा उपक्रमांची सूची ३ फे ब्रुवारीच्या शासन निर्णयात दिलेली आहे; परंतु अनेक संस्थांनी ग्रंथपरिचय, व्याख्यान, निबंध लेखन स्पर्धा, काव्यवाचन, काव्यसंगीत सभा, असे पारंपरिक कार्यक्रम घेण्यातच धन्यता मानली. विद्यापीठात सात दिवस कार्यक्रम घेण्यात आले. पण, त्यामध्ये तांत्रिक कार्यक्रमांचा समावेश नव्हता. शाळा-महाविद्यालयांचीही तशीच स्थिती आहे. मराठी भाषेचा खरोखरच विकास करायचा असेल तर केवळ शासन नियमांची येनकेनप्रकारेण पूर्तता करणे योग्य ठरणार नाही. त्यासाठी अधिक सक्रिय सहभागाची गरज असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

काय आहे शासकीय उपक्रम सूची?विविध मोबाईल अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोबाईलवर मराठीतून टंकलेखन करणे, त्यासाठी लिपिकावर, स्वरचक्र अ‍ॅप, मराठी व्हाइस टायपिंग की बोर्ड, स्पीच नोटस्, हिअर टू रीड मराठी, व्हाईस टू टेक्स्ट, अशा मराठी की बोर्डचा वापर करणे, मराठी विश्वकोश मोबाईल अ‍ॅपचा प्रसार व प्रचार करणे, संगणकावर युनिकोड मराठी कार्यान्वित क रणे, नवीन पर्यायी शब्दनिर्मिती आदी उपक्रम शासनाने सुचविलेले आहेत.

मराठी पंधरवडाही दुर्लक्षितजानेवारी महिन्याचे पहिले १५ दिवस मराठी भाषा पंधरवडा म्हणून शासनातर्फे साजरा करण्याचा आदेश आहे. परंतु अनेक सरकारी कार्यालये आणि अधिकार्‍यांना याचा चक्क विसर पडल्याचे यावर्षी आढळून आले. अनेक कार्यालयांत हा पंधरवडा साजरा न झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते. त्यामुळे राज्य शासन मराठीविषयी कितीही प्रेम दाखवीत असले तरी त्यांचे विभाग त्यादृष्टीने एकसंघ होऊन काम करीत नसल्याचे दिसून येते.

टॅग्स :marathiमराठीAurangabadऔरंगाबादGovernmentसरकार