शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

महानिरीक्षकांकडून विसर्जन मार्ग पाहणी

By admin | Updated: September 6, 2014 00:26 IST

औंढा नागनाथ : येथील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची विशेष पोलिस महानिरीक्षक जगन नाथ यांनी शुक्रवारी दुपारी पाहणी केली.

औंढा नागनाथ : येथील सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या गणपती विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची विशेष पोलिस महानिरीक्षक जगन नाथ यांनी शुक्रवारी दुपारी पाहणी केली. औंढा नागनाथ येथे सोमवारी सार्वजनिक गणेश उत्सवानिमित्त विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीसाठी मार्गामधील अडथळे दूर करण्यासाठी तसेच सुरक्षेसाठी ही पाहणी करण्यात आली. श्री गणपतीची मिरवणूक ग्रामपंचायत कार्यालयापासून प्रारंभ होणार आहे. त्या अनुषंगाने डॉ. हेडगेवार चौक, जुने बसस्थानक, जिरेगल्ली, जोशी गल्ली, चोंढेकर गल्ली, अण्णा भाऊ साठे चौक, सोनारगल्ली मार्गे मिरवणूक काढून गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात येते. या मार्गाची विशेष पोलीस महानिरीक्षक जगन नाथ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी रस्त्यावरून आलेल्या विद्युत वायर काढून घेण्यासह मिरवणुकीदरम्यान हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक एन. अंबिका, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, नीलेश मोरे, पोनि लक्ष्मण केंद्रे, सपोनि ज्ञानोबा पुरी, जमादार नूरखाँ पठाण, शंकर इंगोले, काशीनाथ शिंदे, भीमराव चिंतारे, कैलास सातव, जिया पठाण हे होते. अधिकाऱ्यांना मार्गदर्शनहिंगोली : नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक जगन नाथ यांनी शुक्रवारी हिंगोली जिल्हा दौरा करून महत्त्वाच्या ठिकाणी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली. दरम्यान, हिंगोली येथे बैठक घेवून अधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केले.वसमत, औंढा येथे भेटी दिल्यानंतर महानिरीक्षक जगन नाथ शुक्रवारी दुपारी हिंगोलीत पोहोचले. पोलीस मुख्यालयात सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन श्री विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच आगामी नवरात्रोत्सवानिमित्त प्रतिबंधात्मक कारवाया करण्याबाबत त्यांनी सांगितले. बैठकीस पोलिस अधीक्षक एन. अंबिका, प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक एस. टी. राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील लांजेवार (हिंगोली शहर), निलेश मोरे (ग्रामीण), पोनि शंकर सिटीकर, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक एम. एम. कारेगावकर, सतीशकुमार टाक आदी उपस्थित होते. दरम्यान, कळमनुरी येथेही त्यांनी भेट देवून पाहणी केली. (प्रतिनिधी)हिंगोली शहरातील गांधी चौकापासून कयाधू नदीकडे जाणाऱ्या पारंपरिक श्री विसर्जन मिरवणूक मार्गाची महानिरीक्षकांनी पाहणी करून उत्सवाच्या अनुषंगाने माहिती घेतली.जिल्ह्यातील वसमत, औंढा नागनाथ, हिंगोली, कळमनुरी ही शहरे सार्वजनिक गणेशोत्सव काळात संवेदनशील मानली जातात.महानिरीक्षकांच्या दौऱ्यामुळे जिल्हाभरातील यंत्रणा अधिक सतर्क झाल्याचे चित्र शुक्रवारी पहावयास मिळाले.आगामी नवरात्रोत्सव, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा महानिरीक्षक जगन नाथ यांनी घेतला.