शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

लोह्यातील मग्रारोहयोच्या तपासणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष पथक लोह्यात

By admin | Updated: July 28, 2014 01:00 IST

लोहा : लोहा तालुक्यातील विविध गावांत मग्रारोहयोअंतर्गत झालेल्या विविध विकासकामात झालेल्या करोडोंचा घोटाळा आता राज्यभर गाजल्याने वरिष्ठ पातळीवरून विशेष पथकामार्फत चौकशी

लोहा : लोहा तालुक्यातील विविध गावांत मग्रारोहयोअंतर्गत झालेल्या विविध विकासकामात झालेल्या करोडोंचा घोटाळा आता राज्यभर गाजल्याने वरिष्ठ पातळीवरून विशेष पथकामार्फत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची सहा पथके लोहा तालुक्यात दाखल झाली आहेत़ सहा गावांतील सामाजिक अंकेक्षणअंतर्गत चौकशी होणार असल्याची माहिती लोह्याचे गटविकास अधिकारी व्ही़एऩ रंगवाळ यांनी दिली़लोहा तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत विविध विकासकामे करण्यात आली़ मात्र त्यापैकी बहुतांश कामे ही केवळ कागदोपत्री असल्याची प्रकरणे समोर आली आहेत़ लोहा तालुक्यातील धानोरा (म़) येथे तर कामावर मयत, शिक्षक तसेच सैन्यातील जवान दर्शविण्यात आल्याच्या तक्रारीदेखील प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत़ त्या अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी एका विशेष चौकशी पथकाची स्थापना केली आहे़ तर सदरील तपासदेखील अंतिम टप्प्यात आला असल्याची माहिती पंचायत समिती कार्यालयाकडून देण्यात आली़लोहा तालुक्यातील ११८ गावांपैकी जवळपास ८५ ग्रामपंचायतीमध्ये मग्रारोहयोच्या कामाबाबत चौकशी केली जाणार आहे़ तर त्यापैकी धानोरा, सायाळ, भाद्रा, हाडोली, माळाकोळी, खेडकरवाडी, रिसनगाव या सात गावांत सामाजिक अंकेक्षणअंतर्गत विशेष चौकशी समितीमार्फत चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आदेशित करण्यात आले असून चौकशी समिती लोहा तालुक्यात दाखल झाली आहे़ १३ जुलैपर्यंत सदर समिती लोहा तालुक्यात तळ ठोकून राहणार आहे़ तर धानोरा (म़) येथील जवळपास १ कोटी ६३ लाखांचे प्रकरण सबंध महाराष्ट्रभर गाजल्याने समितीचे लक्ष धानोरा प्रकरणाकडे अधिक आहे़ सदरील समिती गावामध्ये जावून प्रत्यक्ष नागरिकांशी व मजुरांशी संपर्क साधून कामाबाबत सत्यता पडताळून घेणार आहे़ तसेच कामावर जाऊनही पाहणी करणार आहे़ लोहा तालुक्यातील सर्वात मोठा मग्रारोहयोचा घोटाळा आता उघडकीस येण्याची शक्यता आहे़ तर त्यामध्ये ग्रामसेवक, सरपंच, रोजगार सेवक अडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे़ तर या घोटाळेबाजांना पाठीशी घालण्यासाठी काही राजकीय पोटभरू हालचाल करीत असल्याचे चित्र आहे़ सदर समिती लोहा तालुक्यात ३१ जुलैपर्यंत मग्रारोहयोच्या कामाची चौकशी करणार आहे़एकंदरीत लोहा तालुक्यातील मग्रारोहयोच्या घोटाळ्यावर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकामुळे पडलेला पडदा हटणार असून दोषींवर कार्यवाहीचा बडगा उगारला जाणार असल्याचे चित्र तूर्त निर्माण झाले आहे़ तर जिल्हाधिकाऱ्यांची विशेष समिती लोहा तालुक्यात अचानक आल्याने घोटाळे बाजाराचे धाबे दणाणले आहेत़ तर गटविकास अधिकारी यांनी नियुक्त केलेल्या समितीचा तपास अंतिम टप्प्यात आला आहे़ (वार्ताहर)