शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
2
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
3
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
4
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
5
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
6
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
7
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
8
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
9
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण
10
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
11
नवी मुंबईतील शिक्षिकेचं अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत घाणेरडं कृत्य, वडिलांनी बघताच पोलीस स्टेशन गाठले!
12
पत्नी झाली बेवफा! पतीला दारू पाजली अन् नाल्यात ढकलून दिलं; प्रियकरासोबत पळणारच होती, पण...
13
फराह खानचा कुक दिलीपचा पगार किती? आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची सॅलरी पण पडेल फिक्की!
14
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
15
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
16
लस्सीवरून दुकानदारांमध्ये तुफान राडा, एकमेकांवर लाठ्याकाठ्या, दगड विटांनी केला हल्ला
17
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
18
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
19
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
20
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?

दोन महिन्यांनी पाहणी होतेय, मदत लवकर मिळेल तेवढे पहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 15:12 IST

पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, अद्रक आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.

ठळक मुद्देकेंद्राच्या पथकाने बांधावर जाऊन घेतला आढावाअतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना कापणी करता न आल्याने पिकांचे नुकसान झाले.

औरंगाबाद : मराठवाड्यात सरत्या वर्षातील अतिवृष्टीमुळे ३६ लाख शेतकऱ्यांनी २६ लाख हेक्टरवर पेरलेले पीक वाया गेले. त्याला दोन महिने झाल्यानंतर केंद्रीय पथकाने औरंगाबाद व उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातील पाहणी करून नुकसानीचा विभागातील अंदाज बांधण्यासाठी सोमवारी सकाळी ८ वाजेपासून पाहणी दौरा केला.  दोन महिन्यांनी पाहणी होतेय, आता मदत लवकर मिळेल तेवढे पहा, असा संताप औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केला. दौऱ्यापूर्वी रविवारी नुकसानीचे पंचनामे, छायाचित्रे, व्हिडिओ शूटींग पथकातील अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले. त्यावरून नुकसान किती झाले, याचा अंदाज पथकाला आला.

तालुक्यातील निपाणी, पिंपळगाव पांढरी, पैठण तालुक्यातील गाजीपूर, निलजगांव, शेकटा व गंगापूर तालुक्यातील मुरमी, ढोरेगाव, जाखमाथा आणि वरखेड येथील शेतकऱ्यांशी थेट बांधावर जाऊन केंद्रीय पथकप्रमुख तथा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सहसचिव रमेश कुमार गंता, केंद्रीय वित्त मंत्रालयाचे सल्लागार आर. बी. कौल यांनी सोमवारी पाहणी केली. या वेळी पथकातील अधिकाऱ्यांनी निपाणीतील शेतकरी नंदू भालेकर, पांढरी पिंपळगाव येथील शेतकरी विठ्ठल बहुरे, विपीन कासलीवाल, संदीप दुधाळ, दिलीप भालेकर, सखाराम पुंगळे, लालू भालेकर यांच्याशी संवाद साधला. पाहणीदरम्यान विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची उपस्थिती होती.

वीजपुरवठ्याबाबत तक्रारी मांडल्या

वीजपुरवठा रात्री ११ वाजता होतो. तोपर्यंत शेतकऱ्यांना जागरण करून पाणीपुरवठा करावा लागतो. सकाळी ७ वाजेपर्यंत वीज असते. तोपर्यंत शेतकऱ्यांना जागरण करावे लागते. या सगळ्या दृष्टचक्रामुळे शेतकऱ्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असल्याच्या व्यथा पथकासमोर मांडल्या.

नुकसानीची वस्तुस्थिती मांडलीजिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, पथकासमोर पंचनामे, व्हिडिओ शूटींगच्या माध्यमातून नुकसानीची वस्तुस्थिती मांडली. पथकाने जिल्ह्यातील विविध ठिकाणी भेट देऊन कापूस, मका, सोयाबीन, बाजरी, अद्रक आदी पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना कापणी करता न आल्याने पिकांचे नुकसान झाले. केंद्राकडून योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी चव्हाण यांनी व्यक्त केली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र