शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

स्वारातीच्या बांधकामाची आरोग्य संचालकाकडून चौकशी

By admin | Updated: October 31, 2014 00:35 IST

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आरोग्य विभागाच्या वतीने बांधकाम व इतर कामासाठी ९० लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आरोग्य विभागाच्या वतीने बांधकाम व इतर कामासाठी ९० लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला आहे. या रुग्णालयाच्या बांधकामाची आरोग्य संचालकांनी चौकशीही केली आहे. तसेच या रुग्णालयातील रिक्त जागाही भरल्या जाणार असल्याने रुग्णांना येणाऱ्या अडीअडचणी दूर होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.या निधीअंतर्गत सुरू असणाऱ्या कामांमध्ये गैरप्रकार झाला असल्याची तक्रार केल्यावरून या कामाची चौकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे अंबाजोगाई येथे आले होते. त्यांनी चौकशी केली. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात व रुग्णालयात असलेल्या रिक्त जागा महिनाभरात भरण्याचे आश्वासन ‘लोकमत’शी बोलताना दिले. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय हे मराठवाडयातील रुग्णांसाठी आशेचे केंद्र आहे. या रुग्णालयाला विविध समस्यांनी ग्रासले आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या विकासासाठी गेल्या पाच वर्षांत बांधकाम व इतर कामांसाठी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निधीअंतर्गत होणाऱ्या कामांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली होती. या तक्रारींची दखल घेत डॉ. शिनगारे यांनी अंबाजोगाईत रुग्णालयास भेट दिली. सुरू असलेल्या सर्व कामांची चौकशी केली. या संदर्भातील अहवाल ते वरिष्ठांकडे पाठविणार आहेत. तसेच वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षक, कर्मचारी यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू असून येत्या महिनाभरात ही पदे भरण्याचे आश्वासन त्यांनी दिले. अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डेंग्यूसदृश आजारांमुळे रक्तातील पेशींची संख्या कमी व जास्त होण्याचे मोठे प्रकार वाढू लागले आहेत. यासाठी रुग्णालयातच रुग्णांसाठी रक्तातील पेशी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी माजी आ. पृथ्वीराज साठे, डॉ. सचिन काळे यांनी केली होती. या संदर्भात ठोस उपाययोजना आखण्याची सूचना त्यांनी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्याकडे केली आहे.(वार्ताहर)