शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतच्या मागे चौकशीचा ससेमिरा

By admin | Updated: December 3, 2014 01:17 IST

केज : येथील नगर पंचायतच्या वतीने ४ कोटींच्या विकास कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार सय्यद माजेदसह चौघांनी उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे केली होती

केज : येथील नगर पंचायतच्या वतीने ४ कोटींच्या विकास कामात गैरप्रकार झाल्याची तक्रार सय्यद माजेदसह चौघांनी उपविभागीय अधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे केली होती. त्यानंतर याची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना देऊनही सात महिन्यांपासून ते दिले नाहीत. त्यामुळे १ डिसेंबर रोजी संबंधित अभिलेख्यासह त्यांना अंबाजोगाईच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.केज नगरपंचायतीकडे विविध विकास कामांसाठी ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. दलितोत्तर विकास निधी १ कोटी खर्च करण्यात आला. रस्त्यांसाठी ८० लाख रुपये अनुदान, दलित वस्तीच्या विकासासाठी ६० लाख रुपयांचा निधी, विविध कर वसुली निधी ६० लाख रुपये असा एकूण ४ कोटींचा निधी विकास कामांसाठी खर्च करण्यात आला.दरम्यान, हा निधी खर्च करताना काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. उपोषणही करण्यात आले होते. सय्यद माजेदसह चौघांनी १९ डिसेंबर २०१३ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली होती. त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी चौकशी करुन आठवड्यात अहवाल सादर करावा, असे आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र न.प. प्रशासनाने याची दखल घेतली नाही. त्यामुळे २४ नोव्हेंबर २०१४ रोजी पुन्हा उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना १ डिसेंबर रोजी दस्तावेजासह हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांचा साधा प्रतिनिधीही अंबाजोगाईच्या कार्यालयात हजर झाला नाही. मुख्याधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे निदर्शनास येते. याबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नायब तहसीलदार पंडित म्हणाले, संबंधित अभिलेख्यासह ६ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत.