शहरं
Join us  
Trending Stories
1
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
2
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
3
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
4
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
5
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
6
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
7
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
8
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
9
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
10
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
11
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
12
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
13
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
14
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
15
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
16
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
17
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
18
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
19
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
20
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...

आरंभशूर, योजनांचा कोरडा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कचरा प्रश्नात अडकलेल्या औरंगाबाद महापालिकेने आज तीन नव्या घोषणांची भर घातली. बेकायदा नळांना अभय ...

ठळक मुद्देऔरंगाबाद महापालिकेच्या आणखी तीन घोषणा : अनेक योजना केवळ घोषित झाल्या किंवा काही काळानंतर पडल्या बंद

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कचरा प्रश्नात अडकलेल्या औरंगाबाद महापालिकेने आज तीन नव्या घोषणांची भर घातली. बेकायदा नळांना अभय देण्यासाठी केवळ एक हजार रुपयांमध्ये नळ अधिकृत करण्याची योजना जाहीर केली. होर्डिंगमुक्त शहराचे धोरणही राबविण्यात येणार असून, आता यापुढे केवळ वाहतूक पोलिसांच्या परवानगीने होर्डिंग्ज लावले जाणार आहेत. तिसरी घोषणा म्हणजे हडको येथील स्वामी विवेकानंद उद्यानाच्या जागेत साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने संशोधन केंद्र उभारणे. शहरात सिटी बस चालविणे, दोन दिवसांआड संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणे, मोफत अंत्यविधी सेवा देणे, दोन हजार सीसीटीव्ही लावणे, सोलार सिटी तयार करणे आदी महापालिकेने केलेल्या घोषणांची अजिबात अंमलबजावणी झालेली नाही. अनेक योजना केवळ सुरू झाल्या आणि काही काळानंतर बंद झाल्या. केवळ आरंभशूर असलेल्या महापालिकेने बुधवारी आणखी काही घोषणांचा पाऊस पाडला.बेकायदा नळ होणारहजार रुपयांमध्ये अधिकृतऔरंगाबाद : बेकायदा नळ अधिकृत करण्यासाठी महापालिका १५ आॅगस्टपासून फक्त एक हजार रुपये दंड आकारणार आहे. या योजनेचा लाभ न घेणाऱ्या नागरिकांना नंतर महापालिका मोठा दंड आकारणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली. यापूर्वी शहरात तीन लाखांहून अधिक मालमत्ता असताना महापालिकेच्या रेकॉर्डवर फक्त सव्वालाख अधिकृत नळ आहेत. दीड लाखांपेक्षा जास्त अनधिकृत नळधारकांना यापूर्वी पन्नास वेळेस अभय योजनेत साडेतीन हजार रुपये भरून नळ अधिकृत करून घ्यावे म्हणून आवाहन करण्यात आले. मात्र, साडेतीन हजार रुपये दंड आणि वार्षिक पाणीपट्टी मिळून नागरिकांना ७ हजार ५०० रुपये खर्च येत होता. या खर्चामुळे अनेक नागरिक नळ अधिकृत करण्यास पुढे येत नव्हते.उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यावर अनधिकृत नळ कनेक्शनचा मुद्दा सर्वसाधारण सभेत चर्चेला आला होता. मागील अनेक वर्षांपासून किमान दीड लाख नळ कनेक्शनधारक मोफत पाणी घेत आहेत. यामुळे महापालिकेला पाणीपुरवठ्यात मोठा आर्थिक फटका बसत आहे. दरवर्षी पाणीपुरवठ्याचा खर्च ८० ते ९० कोटींपर्यंत पोहोचला आहे. पाणीपट्टी मात्र १५ ते २० कोटी रुपये जमा होते. ४० ते ५० कोटींची तूट मनपाला पाणीपुरवठ्यात सहन करावी लागत आहे. अनधिकृत नळधारकांना कुठेतरी शिस्त लागावी म्हणून ५०० रुपये दंड आकारून नळ अधिकृत करण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. महापौर नंदकुमार घोडेले यांनीही ठराव मंजूर करून प्रशासनाला पाठविला होता. शासन नियमानुसार किमान एक हजार रुपये दंड आकारावाच लागणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी घोडेले यांना सांगितले. आयुक्तांची शिफारस पदाधिकाºयांनी स्वीकारली.किती इंच कनेक्शन माहीत नाही...शहरात महापालिकेच्या मेनलाईनवर हजारो अनधिकृत नळ आहेत. कोणत्या नागरिकाने किती इंची नळ कनेक्शन घेतले आहे, याची माहितीही मनपाला नाही. मनपाच्या नियमानुसार घरगुती नळधारकाला अर्धा इंचाची मुभा देण्यात येते. त्यापेक्षा मोठे कनेक्शन घेतलेले असल्यास त्याचे वेगळे दर लावण्यात येतात. मनपाकडे यासंदर्भात कोणतेच रेकॉर्ड नाही. नागरिकांवर विश्वास ठेवूनच नळ अर्धा इंच समजून अधिकृत करून द्यावे लागणार आहे.होर्डिंगमुक्त शहराचेठरविणार धोरणऔरंगाबाद : शहरात यापुढे कोणालाही अनधिकृत होर्डिंग कुठेही लावता येणार नाही. महापालिका फक्त एक दिवसाची परवानगी होर्डिंग लावणाºयांना देणार आहे. होर्डिंग कुठे लावायचे हे वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार ठरविण्यात येईल. होर्डिंगमुक्त शहराचे कायमस्वरुपी धोरण येणाºया सर्वसाधारण सभेत निश्चित करण्यात येणार असल्याची घोषणा आज महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली.महापालिकेतील राजकीय हस्तक्षेपामुळे आजपर्यंत प्रशासन अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करीत नव्हती. खंडपीठाने सर्व अनधिकृत होर्डिंग काढावेत असे आदेश दिल्यानंतर पोलीस आणि मनपा प्रशासन कामाला लागले. २८ ते ३१ जुलैपर्यंत शहरात व्यापक मोहीम राबविण्यात आली. पोलीस आणि मनपाच्या नऊ वेगवेगळ्या पथकांमार्फत दररोज दोन हजार होर्डिंग काढण्यात आले. चार दिवसांमध्ये तब्बल ८ हजार होर्डिंग काढण्यात आले. होर्डिंगच्या या स्वच्छता अभियानामुळे शहरातील भाऊ-दादांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यापुढे अनधिकृत होर्डिंग उभारल्यास पोलिसांतर्फे थेट गुन्हेच दाखल करण्यात येणार आहेत.दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांनी बुधवारी सांगितले की, पर्यटनाची राजधानी म्हणून या शहराकडे बघितल्या जाते. दरवर्षी शहरात लाखो पर्यटक येतात. चौकाचौकांतील अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्समुळे शहर अत्यंत विद्रूप दिसते. दोन वर्षांपूर्वी इंदूर शहरानेही अशीच व्यापक मोहीम राबवून अनधिकृत होर्डिंगचा बीमोड केला होता. औरंगाबाद शहरही नेहमी स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी होर्डिंगचे एक धोरण येणाºया सर्वसाधारण सभेत निश्चित करण्यात येणार आहे.होर्डिंग्ज स्वत:हून काढण्याची सूचनामहापुरुषांची जयंती, मोठे राजकीय नेते शहरात येत असल्यास त्यांच्या स्वागतासाठी फलक उभारणे, धार्मिक सण आदी कारणांसाठी प्रत्येकाला एक दिवसाची परवानगी होर्डिंग लावण्यासाठी मनपा देणार आहे. जेथे मनात आले तेथे होर्डिंग, पोस्टर्स लावता येणार नाही. महापालिका प्रशासन शहरात होर्डिंग कुठे लावायचे यासंदर्भात पोलिसांच्या सल्ल्यानुसार जागा निश्चित करणार आहे. वाहतुकीला अजिबात अडथळा ठरणार नाही, अशाच ठिकाणी परवानगी देण्यात येणार आहे. ज्यांनी होर्डिंग लावले त्यांनी सायंकाळी ते स्वत:हून काढून घेतले पाहिजे.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न