गुन्हेगारांची माहिती आता एका क्लिकवर

By Admin | Updated: August 10, 2014 02:22 IST2014-08-10T02:04:48+5:302014-08-10T02:22:22+5:30

शिरीष शिंदे, बीड इंटरनेट व कॉम्पयुटर सॉफ्टवेअर या माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करुन पोलीस यंत्रणा हायटेक करण्याचे काम केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एनसीआरबीच्यावतीने करण्यात येत आहे.

The information of criminals is now one click | गुन्हेगारांची माहिती आता एका क्लिकवर

गुन्हेगारांची माहिती आता एका क्लिकवर



शिरीष शिंदे, बीड
इंटरनेट व कॉम्पयुटर सॉफ्टवेअर या माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर करुन पोलीस यंत्रणा हायटेक करण्याचे काम केंद्रीय गृह मंत्रालयाच्या एनसीआरबीच्यावतीने करण्यात येत आहे. देशातील सर्व पोलीस ठाणे आॅनलाईन करण्याचा ‘क्राईम अ‍ॅन्ड क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम’ (सीसीटीएनएस) ही महात्वाकांक्षी योजना प्रत्येक जिल्ह्यात कार्यान्वीत करण्यात येत आहे. त्यामुळे दिल्लीतील गुन्हेगाराची सखोल माहिती बीडच्या पोलिसांना कॉम्प्युटरवर पहावयास मिळेल.
एनसीआरबीच्यावतीने सीसीटीएनएस योजनेर्तंगत एफआयआरची आॅनलाईन नोंदणी, गुन्हेगार यांचा बायोडाटा, पोलीस संख्या बल, त्यांच्या बदल्या व इतर माहिती आदानप्रदान करणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे गुन्हेगारांना पकडणे पोलिसांना शक्य होईल. सद्य परिस्थितीला अशी कोणतिही यंत्रणा कार्यान्वीत नाही की दुसरा जिल्हा किंवा राज्यातील गुन्हेगारांची माहिती सहज उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे फरार असलेला आरोपी महिनोमहिने फरार असणे व पुन्हा त्याच प्रकारची गुन्हे घडत असल्याचे यापुर्वी समोर आले आहे. परिणामी आरोपी पकडण्यास विलंब होतो अन न्याय मिळण्यासही विलंब होतो. ही समस्या लक्षात घेत सीसीटीएनएस योजना सुरु करण्यात येत आहे.
काय आहे एनसीआरबी ?
केंद्रीय गृह मंत्रालय विभागाच्यावतीने पोलिस यंत्रणा माहिती व तंत्रज्ञानाद्वारे सक्षम करण्यासाठी नॅशनल क्राईम रेकॉडर्स ब्युरो (एनसीआरबी )ची स्थापना करण्यात आली आहे. एनसीआरबीच्यावतीने देशातील पोलीस ठाणे जोडण्यासाठी व माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी ७७२ सर्व्हर सुरु करण्यात आली आहे. या सर्व्हरमध्ये प्रत्येक जिल्ह्यातील कॉईम रेकॉड्स ब्युरो, स्टेट क्राईम रेकॉड्स ब्युरो व क्रामई क्रिमीनल इन्फॉरमेशन सिस्टीम यांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर एनसीआरबीने ‘क्राईम अ‍ॅन्ड क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम’ (सीसीटीएनएस) ही योजना प्रत्येक जिल्ह्यात सुरु करण्याचा निर्णय घेतला. पोलीस अधिकाऱ्यांना तपासासाठी मदतपुर्ण ठरणारे तंत्रज्ञान व गुन्हेगारांची अचूक माहिती सांगणारे सॉफ्टवेअर तयार करणे, पोलीस विभागाचे एकत्रित माहिती, वर्गीकरण, बदल्या आदी डाटा तयार करणे, ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यांची माहिती, त्याचा तपास व न्यायालयीन स्थिती याचे संकलन करण्यात येते.
सीसीटीएनएसला जोडले
जाणार सर्व पोलीस स्टेशन
‘क्राईम अ‍ॅन्ड क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम’ (सीसीटीएनएस) द्वारे देशातील सर्व पोलीस स्टेशन जोडली जातिल. त्यासाठी प्रत्येक पोलीस स्टेशनला हायस्पीड असलेले इंटरनेट कनेश्नद्वारे जलद गतीने माहिती ट्रान्सफर करण्यावर भर दिला जाईल. ही योजना राज्यात सुरु करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. अपघात, गुन्हा, गुन्ह्याचे स्वरुप, गुन्हेगारांचे फोटो, पुर्वी पकडला असल्यास त्याच्या बोटांचे ठसे, जिल्ह्यातून चोरी गेलेल्या गाड्यांची माहिती, शिक्षा भोगत असलेले कैदी आदी आॅनलाईन पद्धतीने अपलोड केले जाईल. त्यामुळे गुन्हेगार व गुन्हेगारीवर आळा बसविण्यास प्रयत्न केला जाईल. विशेष म्हणजे, १९५३ पासून अपघातात मृत्यू झालेले व आत्महत्या केलेल्या लोकांची माहिती नॅशनल क्राईम रेकॉडर्स ब्युरो (एनसीआरबी ) या वेबसाईडवर टाकण्यात येईल.
फक्त पोलिसांसाठी ही योजना
सामान्य नागरिकांना आॅनलाईन पद्धतीने ठाण्यातून एफआयआरची प्रत मिळु शकेल. या शिवाय त्यांना इतर कोणतिही माहिती गुन्हेगारांना मिळू शकणार नाही.


पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘क्राईम अ‍ॅन्ड क्रिमीनल ट्रॅकींग नेटवर्क सिस्टीम’ (सीसीटीएनएस) या योजनेचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. जवळपास सर्व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पुर्ण झाले आहे. सीसीटीएनएससाठी प्रत्येक ठाण्याला चार संगणक दिले जाणार आहे. त्यात विविध प्रकारच्या आॅनलाईन सुवीधा पोलिसांना मिळतील. एनसीआरबीच्या सुचना आल्यावर योजना जिल्ह्यात सुरु होईल असे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

Web Title: The information of criminals is now one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.